Homeताज्या बातम्या

श्रीगोंदा तालुक्यात धक्कादायक; शेताच्या बांधावरील किरकोळ वादातून ७८ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या

श्रीगोंदा : तालुक्यातील पिसोरेखांड येथील गावडेमळा परिसरात शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या किरकोळ कारणावरून ७८ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची कुऱ्हाडी

बीड बस स्थानकावरील महिला चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; शिवाजीनगर पोलिसांची रंगेहात धडक कारवाई, दोन महिला अटकेत
टाकळी (ता. गेवराई) येथे शेतकर्‍याची आत्महत्यानापिकी, कर्जबाजारीपणा व रोजगाराच्या चिंतेचा उल्लेख
अकोले तालुक्यात खळबळ; वीज चोरी पकडणाऱ्या महावितरणच्या पथकावर हल्ला, आरोपींवर गुन्हा दाखल
कोयत्यासह कुऱ्हाडीने वार करून महाविद्यालयीन तरुणाचा निर्घृण खून; बारामती  तालुक्यातील कारखेल येथील घटना | Navarashtra

श्रीगोंदा : तालुक्यातील पिसोरेखांड येथील गावडेमळा परिसरात शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या किरकोळ कारणावरून ७८ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १२ जून २०२६) सकाळी घडली. या पाशवी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि हळहळीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत विजय पोपट गावडे (रा. गावडेमळा, पिसोरेखांड) यांनी श्रीगोंदा पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पोपटराव रावजी गावडे (वय ७८) यांचा शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या कारणावरून आरोपी विलास दादा गावडे याच्याशी वाद झाला होता. हा वाद टोकाला गेल्याने आरोपीने संतापाच्या भरात पोपटराव यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने गंभीर वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात पोपटराव गावडे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमन आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. घटनेनंतर आरोपी विलास गावडे फरार झाला असून, त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर करीत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे गावात तणाव असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

COMMENTS