आदिवासी बांधवांसाठी २३१ कोटी अनुदान मंजूर- अमित आगलावे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

आदिवासी बांधवांसाठी २३१ कोटी अनुदान मंजूर- अमित आगलावे

महाराष्ट्र शासनाने दि २६ मार्च २०२१ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील पात्र आदिवासी बांधवांना राज्यात कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे कामे बंद असल्याने

समन्यायी कायद्याबाबत आम्ही भांडत होतो तेव्हा ‘ते’ का गप्प होते – ना.थोरात
कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हा ; महावितरणचे आवाहन
नगर शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट…

कोपरगाव शहर प्रतिनिधी-   महाराष्ट्र शासनाने दि २६ मार्च २०२१ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील पात्र आदिवासी बांधवांना   राज्यात कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊन मुळे कामे बंद असल्याने   अनुसूचित जमातीच्या कुटुंबा समोर उद्भवलेल्या बेरोजगारीचा प्रश्न विचारात घेऊन त्यांना अनुदान स्वरूपात लाभ देण्याच्या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाच्या दि १२ ऑगस्ट २०२० च्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली होती त्या अनुसार या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना प्रत्येक कुटुंब  चार हजार रुपये इतक्या रकमेचा लाभ  देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यापैकी रुपये २००० इतकी रक्कम लाभार्थीच्या बँक किंवा पोस्टाच्या खात्यात थेट स्वरूपात देण्यात येणार आहे हा प्रथम टप्पा आहे यामुळे अनेक आदिवासी बांधवांना मोठी मदत मिळणार आहे हे मिळून देण्यासाठी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष  काळे यांनी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करून कोपरगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांना खावटी अनुदान मंजूर केल्याबद्दल आदिवासी कोळी महादेव युवक संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे यांनी सांगितले संघटनेच्या माध्यमातून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजुर तालुका अकोले यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला गेला त्यामुळे अनेक वर्षानंतर कोपरगाव तालुक्यात खावटी अनुदान मिळण्यासंदर्भात गावोगावी शासकीय यंत्रणेने सर्वे केला व आत्ता आत्ता प्रत्येक कुटुंबाला पहिल्या हप्त्यात रुपये २००० मिळणार आहे तरी सर्व पात्र आदिवासी बांधवांनी संपर्क साधून आपल्या नावा ची खात्री करून घ्यावी आदिवासी बांधवांना खावटी अनुदान मंजूर केल्याप्रकरणी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब व माननीय आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी साहेब, आदिवासी राज्य मंत्री माननीय प्राजक्त दादा तनपुरे साहेब यांचे संघटनेच्यावतीने विशेष आभार मानण्यात आले

COMMENTS