Homeताज्या बातम्यादेश

ब्राझीलमध्ये विमान अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः ब्राझीलमध्ये विमान अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 12 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्सचा समावेश असल्याची माहित

संगमनेरची शांतता बिघडवणार्‍यांना यशस्वी होऊ देऊ नका
या षडयंत्राला बळी पडू नका!
वर्तमान क्रिकेटमधील वादग्रस्त घटना व त्यांचे पडसाद 

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः ब्राझीलमध्ये विमान अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 12 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्सचा समावेश असल्याची माहिती आहे. अपघातात मृत्यूमुखी 12 प्रवाशी अमेरिकन पर्यटक असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वजण ब्राझीलच्या अ‍ॅमेझोनच्या बार्सेलोस येथे जात असल्याचे समोर आले आहे.  
ब्राझीलच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता हा अपघात झाला. दुर्घटना घडली त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता, तसेच खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गव्हर्नर विल्सन लिमा यांनी सांगितले की, हे विमान मॅनौस एरोटॅक्सी एअरलाइनचे होते. कंपनीने देखील अपघाताला दुजोरा देणारे निवेदन जारी केले आहे. विमान दुर्घटनेचा तपास सुरू आहे, मात्र अद्याप याप्रकरणी फारशी माहिती मिळालेली नाही, असे कंपनीने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमान खराब हवामानामुळे कोसळले असावे. लँडिंगच्या वेळी मुसळधार पाऊस पडत होता. विमान उतरण्याच्या प्रयत्नात असताना कमी दृष्यमानतेमुळे हा अपघात झाला असावा.

COMMENTS