Homeताज्या बातम्या

राजधानीत ई-20 इंधन धोरणाविरोधात आम आदमी पार्टीचा मोर्चा; अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन

नवी दिल्ली : ई-20 इंधन धोरणाच्या विरोधात आम आदमी पक्षाने मंगळवारी राजधानी दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानाकडे मोर्चा काढला. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक

केजरीवाल मद्य धोरण कटात सहभागी
अरविंद केजरीवाल यांची आज ईडी चौकशी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचं समन्स
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार,  पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली ...

नवी दिल्ली : ई-20 इंधन धोरणाच्या विरोधात आम आदमी पक्षाने मंगळवारी राजधानी दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानाकडे मोर्चा काढला. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी फिरोजशहा मार्गावरच अडविले. त्यानंतर केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंह, जस्मिन शाह यांच्यासह पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले.

पक्षाच्या म्हणण्यानुसार, देशभरातून ई-20 इंधन धोरणाच्या विरोधात दोन लाख तीस हजारांहून अधिक नागरिकांची लेखी निवेदने गोळा करण्यात आली असून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रत्यक्ष सुपूर्द करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी पुढे जाण्यास परवानगी नाकारल्याने आंदोलनकर्त्यांनी घटनास्थळीच निदर्शने केली. मोर्चादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, देशभरातील लाखो नागरिकांनी ई-20 इंधन धोरणाविरोधात पंतप्रधानांना उद्देशून पत्रे लिहिली आहेत. ही पत्रे स्वतः पंतप्रधानांच्या हाती देण्याची आमची इच्छा आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला असून भेटीची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे दावा केला की, या विषयावर चर्चा करण्यासाठी गेल्या महिन्यात पंतप्रधानांना पत्र पाठवून भेटीची वेळ मागितली होती. मात्र, त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जनतेची भूमिका थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिल्ली भाजपचे अध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांनी या आंदोलनावर टीका केली. त्यांनी आरोप केला की, परवानगीशिवाय आंदोलन करून नंतर सरकारवर दोषारोप करण्याची आम आदमी पक्षाची जुनी राजकीय पद्धत आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात अराजकतेचे राजकारण करण्याची स्पर्धा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. मल्होत्रा म्हणाले की, कायद्याचे पालन करणे प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. परवानगीशिवाय पंतप्रधान निवासस्थानाकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी अडविल्यास त्याचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. ई-20 इंधन धोरणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि आम आदमी पक्ष यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ई-20 धोरणावर गंभीर प्रश्नचिन्ह आंदोलनाला संबोधित करताना केजरीवाल यांनी ई-20 इंधन धोरणावर अनेक आक्षेप नोंदविले. त्यांच्या मते, हे धोरण सर्वसामान्य वाहनधारकांच्या हिताचे नसून त्यातून अनेक तांत्रिक आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यांनी आरोप केला की, परदेशातून इथेनॉल आयातीसाठी भारतावर दबाव टाकला जात असून त्याचा भार भारतीय ग्राहकांवर टाकला जात आहे. त्यांनी असेही म्हटले की, हे धोरण रोखण्यासाठी देशव्यापी मोठी लोकचळवळ उभारण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश परीक्षेतील कथित गैरव्यवहाराविरोधातील आंदोलनापेक्षाही व्यापक जनआंदोलन उभे राहू शकते, असा दावा त्यांनी केला.

शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केंद्र सरकारकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. पेट्रोल पंपांवर ई-20 मिश्रित इंधनाबरोबरच शुद्ध पेट्रोलही उपलब्ध करून द्यावे, नागरिकांना पर्याय निवडण्याचा अधिकार मिळावा आणि ई-20 इंधनाच्या किमती कमी कराव्यात, अशी पक्षाची भूमिका आहे. पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले की, पंतप्रधानांशी चर्चा करण्यासाठी महिनाभरापूर्वीच वेळ मागण्यात आली होती. मात्र, अद्याप भेट मिळालेली नसल्यामुळे जनतेची निवेदने प्रत्यक्ष देण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

COMMENTS