Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आत टाकून दाखवाच, लाट काय असते कळेल ?

मनोज जरांगेंनचा फडणवीसांना पुन्हा इशारा

बीड ः मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रविवारपासून संवाद दौर्‍यास सुरूवात केली आहे. त्यांचा पहिलाच संवाद दौरा बीड जिल्ह्यातील वानगाव याठिकाणी घेण्य

मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात खलबते
फडणवीसांवर बोलाल तर गाठ मराठ्यांशी
…तर, विधानसभेच्या 288 जागा लढवणार : मनोज जरांगे

बीड ः मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रविवारपासून संवाद दौर्‍यास सुरूवात केली आहे. त्यांचा पहिलाच संवाद दौरा बीड जिल्ह्यातील वानगाव याठिकाणी घेण्यात आला. यावेळी त्यांनी मराठा बांधवांना मार्गदर्शन करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. फडणवीस पोलिसांचे कान फुकत आहेत. माझ्याविरोधात एसआयटी चौकशी लावली आहे. पण मी इंचभरही मागे हटणार नाही. मी चौकशीसाठी तयार आहे. फडणवीस यांनी मला आत टाकून दाखवावेच, त्यानंतर भावनिक लाट काय असते? हे त्यांना दिसेल. तुमचा सगळा सुपडा साफ होईल, असे आव्हानच मनोज जरांगे यांनी फडणवीस यांना दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात मराठा समाजाने उमेदवारी अर्ज भरावेत, असा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे का? यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, मराठे काहीही करू शकतात. सरकारने तर आमचे बॅनर आणि फलक काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचे आहेत. आमच्या घरावर पत्रक चिकटवायचे आहेत. तेव्हा आम्हीही सहन करणार नाही, असे म्हणत पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले. मनोज जरांगे पुढे म्हणाले, माननीय न्यायालयाने आम्हाला शांततेत रास्ता रोको करण्याचे निर्देश दिले होते. तरीही आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आम्ही काहीही करणार नव्हतो. माझ्या उपोषणाचा 15 वा दिवस असताना 22 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने 13 मार्चला पुढील तारीख दिली होती. पण एका रात्रीत गृहमंत्र्यांनी तारीख बदलून 23 फेब्रुवारी करून घेतली. त्यानंतर एका गुप्त बैठकीत ठराव झाला, ‘मनोज जरांगेला 10 टक्के आरक्षण स्वीकारायला लावा, नाहीतर त्याला गुंतवा.’ असा ठराव झाल्याचे कळल्यामुळे त्यादिवशी आमच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया दिल्याचे जरांंगे यांनी म्हटले आहे.  सरकारने दडपशाही सुरू केली असून, तीन-चार दिवस बघू त्यानंतर निर्णय घेऊ. आठ ते नऊ तारखेपर्यंत समाजाने शांत राहावे, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. फडणवीस यांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आखला होता. हा प्रयोग संभाजीनगरमध्येच होणार होता. मात्र, महिला कार्यकर्त्यांच्या आडून एवढा खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्याचे काम नाही, हे तुम्हाला शोभत नाही, अशा शब्दात मनोज जरांगे यांनीफडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

‘माझ्या दारात यायचे नाही असे स्टिकर तयार करा’ – मराठा समाजातील मुलांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांच्या मनामध्ये मराठा समाजाबद्दल द्वेष ठासून भरला आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच मराठा समाजाचे बॅनर, बोर्ड पोलिसांच्या माध्यमातून काढले जात असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तुम्हालाही तुमचे बोर्ड लावावे लागतील ना, अशा शब्दात त्यांनी फडणवीस यांना इशारा दिला आहे. माझ्या दारात यायचे नाही असे लिहिलेले स्टिकर तयार करण्याचे निर्देश मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील बांधवांना दिले आहेत. हे स्टिकर घर, गाड्यांवर पॉम्प्लेट तयार करून चिटकवण्याची मोहीम सुरू करा, असे देखील त्यांनी सांगितले आहे.

COMMENTS