Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

सिंदूर मोहीमेतून दहशतवाद्यांना चोख उत्तर; ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचा इशारा

नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने केलेल्या ‘सिंदूर मोहिमेला’ आज एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवालय उद्योग समूह आणि संध्याताई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांना सवलतीच्या दरात पिठाच्या गिरण्या व शिलाई मशिनचे वाटप
अहिल्यानगर जिल्हा डिफेन्स उत्पादनाचे मुख्य हब मुख्यमंत्री फडणवीस ; शिर्डीतील क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे लोकार्पण
संरक्षणाप्रमाणे नॉलेज कॉरिडॉर तयार करण्याची गरजसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रयागराज येथे प्रतिपादन
Operation Sindoor | 'ही अभिमानाची गोष्ट...', 'ऑपरेशन सिंदूर'वर PM मोदींची  पहिली प्रतिक्रिया | PM Modi praised armed forces

नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने केलेल्या ‘सिंदूर मोहिमेला’ आज एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या धैर्य, अचूक नियोजन आणि पराक्रमाचे कौतुक करत भारत दहशतवाद आणि त्याला पाठिंबा देणार्‍या संपूर्ण यंत्रणेचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या मोहिमेमुळे भारताची संरक्षण क्षमता, सैन्यदलांमधील समन्वय आणि स्वदेशी संरक्षण व्यवस्थेची ताकद जगासमोर अधोरेखित झाल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले की, वर्षभरापूर्वी भारतीय सैन्याने अतुलनीय धैर्य दाखवत पहलगाम येथे निरपराध भारतीयांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला कठोर उत्तर दिले होते.‘सिंदूर मोहीम’ ही केवळ प्रत्युत्तरात्मक कारवाई नव्हती, तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या ठाम भूमिकेचे प्रतीक होती. या मोहिमेने भारत दहशतवादाविरोधात कोणतीही तडजोड करणार नसल्याचा स्पष्ट संदेश जगाला दिला. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, या कारवाईत भारतीय सैन्यदलांनी दाखवलेली सज्जता, अचूक नियोजन आणि परस्पर समन्वय देशाच्या लष्करी क्षमतेचे दर्शन घडवणारा होता. स्थलसेना, नौदल आणि वायुदल यांच्यातील समन्वयामुळे ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे पार पडली. संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान, आधुनिक शस्त्रसामग्री आणि आत्मनिर्भरतेवर दिलेल्या भरामुळे भारताची सुरक्षा अधिक मजबूत झाल्याचेही त्यांनी नमूद केले. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. भारताने या हल्ल्याकडे केवळ सीमावर्ती घटना म्हणून न पाहता त्यामागील संपूर्ण दहशतवादी जाळ्यावर प्रहार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 7 मेच्या पहाटे भारतीय सैन्याने ‘सिंदूर मोहीम’ सुरू केली. या मोहिमेदरम्यान पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी प्रशिक्षण छावण्यांवर अचूक हवाई हल्ले करण्यात आले. या कारवाईत अनेक दहशतवादी ठार झाले आणि त्यांच्या तळांचे मोठे नुकसान झाले. भारतीय सैन्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवली. सीमापार जाऊन दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याच्या या कारवाईने भारताच्या लष्करी क्षमतेची जगभरात चर्चा झाली. ‘सिंदूर मोहीमे’च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवे संरक्षण तत्त्व स्पष्ट केले होते. भारतावर होणार्‍या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत दहशतवाद्यांसह त्यांच्या समर्थकांनाही मोजावी लागेल, असा कठोर इशारा त्यांनी दिला होता. तसेच कोणत्याही अणु धमकीसमोर भारत झुकणार नाही, हेही त्यांनी ठामपणे सांगितले होते. राजकीय आणि सामरिक तज्ज्ञांच्या मते, ‘सिंदूर मोहीम’ ही भारताच्या दहशतवादविरोधी धोरणातील महत्त्वाची पायरी ठरली. यामुळे भारताने केवळ संरक्षणात्मक भूमिका न घेता गरज पडल्यास आक्रमक पवित्राही स्वीकारू शकतो, हे जगासमोर सिद्ध झाले. तसेच दहशतवादाला आश्रय देणार्‍या शक्तींना थेट इशारा देण्यात भारत यशस्वी ठरला.

भारताच्या सार्वभौमत्वाविषयीी तडजोड कदापी करणार नाही
एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही या मोहिमेची चर्चा देशभरात सुरू आहे. भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव करताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा देशवासियांना विश्‍वास दिला की, भारताची सुरक्षा आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी सरकार आणि सैन्यदल कोणतीही तडजोड करणार नाहीत. दहशतवादाविरोधातील लढा अधिक तीव्रपणे सुरू राहील आणि देशाच्या सुरक्षेला आव्हान देणार्‍या प्रत्येक शक्तीला कठोर उत्तर दिले जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS