राहाता: येथील शारदा कन्या विद्यामंदिर येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि प

राहाता: येथील शारदा कन्या विद्यामंदिर येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व भावपूर्ण अभिवादन करून झाली. यानंतर उऱ्हे पी. आर. यांनी प्रास्ताविक करताना संयुक्त कार्यक्रमामागील भूमिका विशद केली आणि दोन्ही महापुरुषांच्या उत्तुंग कर्तृत्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी आराध्या दीपक वहाडणे व श्रुती किरण खापटे यांनी केले.
याप्रसंगी विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर, विचारांवर आणि देशासाठीच्या अतुलनीय योगदानावर मराठी व इंग्रजी भाषेतून आपली मनोगते व्यक्त केली. साबळे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून स्वतः लोकगीत सादर केले. तसेच शिक्षक जाधव के. एस. यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनप्रवासावर आणि विचारांवर मौलिक विचार मांडत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संकुलनाचे मार्गदर्शक रमेश शिंदे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थिनींना स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची व स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक संघर्षाची माहिती दिली. प्रभारी मुख्याध्यापक साळवे आर. व्ही. यांनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे मंथन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद विद्यालयाचे पर्यवेक्षक देशमुख यांनी भूषवले.
या कार्यक्रमास शारदा शैक्षणिक संकुलाच्या प्रभारी प्राचार्य संसारे शीला, प्राचार्या निशा चिंगोट यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी उपस्थित होते. शेवटी जाधव एस. टी. यांनी उपस्थितांचे व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

COMMENTS