तुम्हाला दिव्यांग मुले होतील…इंदुरीकर महाराजांनी दिला शाप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुम्हाला दिव्यांग मुले होतील…इंदुरीकर महाराजांनी दिला शाप

अहमदनगर/प्रतिनिधी : स्टाईलबाज कीर्तन-प्रवचनांतील विविध वक्तव्यांमुळे सतत चर्चेत व वादात राहणारे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती महार

कोपरगाव बाजार समितीत जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू-स्नेहलता कोल्हे.
पीक विमा कंपन्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ ;महसूलमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील
28 वर्षांनी पुन्हा भरली इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा

अहमदनगर/प्रतिनिधी : स्टाईलबाज कीर्तन-प्रवचनांतील विविध वक्तव्यांमुळे सतत चर्चेत व वादात राहणारे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी शापवाणी उच्चारली असून, त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ विना परवाना यू ट्युबवर अपलोड करणार्‍या यू ट्युबर्सना…तुम्हाला दिव्यांग मुले होतील, असा शाप दिला आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज आता पुन्हा चर्चेत आले आहेत.
अकोल्यातील कौलखेड भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकार्‍याने एका कार्यक्रमानिमित्त इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित केले होते. त्यावेळी इंदुरीकर म्हणाले, माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ यू ट्युबवर अपलोड करून आतापर्यंत चार हजार लोकांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यांना पैसे मोजायलाही वेळ नाही. मात्र, त्यांच्यामुळेच मी सतत अडचणीत आलो आहे. त्यामुळे माझ्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यू ट्यूबवर टाकणार्‍यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील.’, असे ते म्हणताच उपस्थितांनी त्यांना टाळ्या वाजवून साथही दिली.
आपल्या प्रवचन व कीर्तनाचे तसेच भाषणांचे व्हिडिओ विना परवाना यू ट्युबवर अपलोड करू नका, असे आवाहन त्यांनी याआधी केले आहे व यासंबंधी अनेकदा पोलिस प्रशासनाकडे तक्रारीही केल्या आहेत. पण त्याचा काहीही परिणाम होत नसल्याने अखेर इंदुरीकर यांनी आता यू ट्युबर्सना थेट ‘शाप’च दिला आहे व आपल्या भाषणाचे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावणार्‍यांची मुले दिव्यांग जन्माला येतील, असे वक्तव्य केले आहे. मागील दोन वर्षांपासून इंदुरीकर महाराज विविध वक्तव्यांमुळे अडचणीत आले आहेत. पुत्रप्राप्ती संबंधी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना न्यायालयीन खटल्यालाही सामोरे जावे लागले. यामध्ये त्यांना जिल्हास्तरावर दिलासा मिळाला असला तरी उच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. मात्र, आपण अडचणीत येण्याचे खापर त्यांनी यूट्युबर्सवर फोडले आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा यावरून टीका केली होती. यावेळी मात्र थेट शाप दिल्याप्रमाणेच वक्तव्य केल्याने त्यांच्या या नव्या वक्तव्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

जाहीरपणे नाराजी व्यक्त
इंदुरीकर महाराज यांनी आता त्यांच्या कीर्तन-प्रवचनादरम्यान व्हिडिओ करण्यावर मनाई केली आहे. याशिवाय ज्यांनी आपल्या परवानगीशिवाय कीर्तन-प्रवचनाचे व्हिडिओ अपलोड केले आहेत, ते काढून टाकण्याचे आवाहन करताना कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. एका प्रकरणात आपली फसवणूक झाल्याची तक्रारही त्यांनी गेल्याच महिन्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, आता त्यांनी अशा लोकांचा कीर्तनातून जाहीर समाचार घेत नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. त्यांनी यापूर्वी अनेकदा आपल्या शैलीत टीकाही केली होती. मात्र, आता थेट शाप दिल्याप्रमाणेच वक्तव्य केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

COMMENTS