Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींनी केली पिचड यांची आस्थेने चौकशी

अकोले ः क्या कैसे हो, हात को क्या हुआ, काळजी घ्या सांगत पंतप्रधान मोदी यांनी व्यासपीठावर असणारे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची आस्थेन

प्रवासी भारतीय देशाचे राष्ट्रदूत – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी, शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
खा. शरद पवार व ठाकरेंनी एनडीएमध्ये यावे

अकोले ः क्या कैसे हो, हात को क्या हुआ, काळजी घ्या सांगत पंतप्रधान मोदी यांनी व्यासपीठावर असणारे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची आस्थेने चौकशी केली तर माजी आमदार वैभव पिचड यांनी मोदीजी यांना जय श्रीराम म्हणताच पंतप्रधान मोदींनी  चांगले काम करा वडिलांची काळजी घ्या असे सांगत पंतप्रधान मोदी बीडकडे रवाना झाले.
नगर येथे भाजप व महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे व शिर्डी चे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान  नरेंद्र मोदी आले होते .या कार्यक्रमास तब्येत बरी नसताना व हात फ्रॅक्चर असूनही  पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा आग्रह व पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी माजी मंत्री मधुकर पिचड  नगर येथे आवर्जून उपस्थित होते तर माजी आमदार  वैभव पिचड आपल्या कार्यकर्त्या सह या कार्यक्रमास उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण आटोपल्यानंतर ते जायला निघाले त्यावेळी व्यास पिठावर  सर्वच उपस्थितांना भेटत असताना मंत्री दादा भुसे यांची भेट घेत असताना त्यांचे शेजारी उभे असलेले श्री पिचड यांचेकडे लक्ष्य जाताच पंतप्रधान यांनी त्यांची भेट घेत  तुम्ही कसे आहात हाताला फ्रॅक्चर कसे झाले त्यावर पिचड व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपशील सांगितला तर निळवंडे कार्यक्रमास भेट झाल्याचेही  पंतप्रधान यांनी आठवण करून देतानाच काळजी घ्या असा पिचड यांना सांगितले .तर माजी आमदार वैभव पिचड यांनी जय श्रीराम म्हणत पंतप्रधान मोदींना नमस्कार करताच  निवडणुकीत  मतदान वाढवा,वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष्य ठेवा असे सूचित करून पंतप्रधान बीडकडे रवाना झाले. वैभव पिचड (माजी आमदार)देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी  नगर येथे डॉ .सुजय विखे,सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. मोठी माणसे ही मोठीच असतात याचा  अनुभव आला. वडील व्यास पिठावर असताना मोदी भाषण संपवून निघाले असताना त्यांचे लक्ष्य त्यांच्याकडे गेले. त्यांनी लगेच आपला हात हातातदेऊन वडिलांची (माजी मंत्री पिचड) तब्येतीची व हात फ्रॅक्चर बाबत आस्थेने चौकशी केली, काळजी घेण्याचा सल्ला दिला निळवंडे जलाशय उदघाटन कार्यक्रमात भेटीची आठवणही करून दिली .शेवटी माझी भेट झाली मी जय श्रीराम म्हटले त्यांनीही  जयश्रीराम चा प्रतिसाद देऊन चांगले काम करा वडिलांना जपा काळजी घ्या असे सांगितले .देश नव्हे तर जगात प्रसिद्धी मिळालेले व्यक्तिमत्व मोदीजी चे असून त्यांचे नेतृत्व खर्‍या अर्थाने भावले.

COMMENTS