Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पश्‍चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्यासाठी सकारात्मक

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची आ.आशुतोष काळेंना ग्वाही

कोपरगाव ः कोपरगाव मतदार संघाची सातत्याने वाढती लोकसंख्या व त्याप्रमाणात नव्याने पाणी उपलब्धता झालेली नाही.दुसरीकडे समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या

दिव्यांग बांधवांच्या वेदना कमी झाल्याचे समाधान
 कोपरगावात कोरडा दुष्काळ जाहीर करा ः आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी
मोबाईलपेक्षा मैदानी खेळांना महत्व द्यावे

कोपरगाव ः कोपरगाव मतदार संघाची सातत्याने वाढती लोकसंख्या व त्याप्रमाणात नव्याने पाणी उपलब्धता झालेली नाही.दुसरीकडे समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या नावाखाली दुष्काळात आमच्या पाण्यातून मराठवाड्याला सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे नगर-नाशिक-मराठवाडा वाद निर्माण झालेला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पश्‍चिमेला वाहून जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोर्‍यात वळविणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी खंबीर भूमिका घ्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी केली असता त्या मागणीचा धागा पकडत उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी पश्‍चिमेला वाहून जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोर्‍यात वळविण्यासाठी यापूर्वी देखील हे काम हाती घेतले असल्याचे सांगत दिवसेंदिवस बिकट होत चाललेला पाणी प्रश्‍न व निर्माण झालेला नगर-नाशिक-मराठवाडा वाद कायमचा मिटविण्यासाठी या कामाला गती देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी आ.आशुतोष काळे यांना दिली आहे. कोपरगाव येथे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस बोलत होते.यावेळी त्यांनी महायुती शासनाच्या सहकार्याने कोपरगाव मतदार संघाचा चांगला विकास झाल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांचे कौतुक केले.

फडणवीसांनी कर्मवीर काळे यांच्या पुतळ्यास केले अभिवादन – लोकसभेच्या तिसर्‍या टप्यातील निवडणूक तीन दिवसांवर आली असून सर्वत्र प्रचार सभांचा जोर वाढलेला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर तर मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडत असतांना कोपरगावची सभा आटोपल्यानंतर आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणातील कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

COMMENTS