स्वस्तात सोने देणार अखेर पोलिसांनी केले गजाआड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वस्तात सोने देणार अखेर पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर/प्रतिनिधी- स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून असे सोने घेण्यासाठी आलेल्यांना मारहाण करून लुटणार्‍यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. स्वस्तात सोन

नेवाशात तिघांची 35 लाखांची फसवणूक
शिक्षक कॉलनीतील धोकादायक विज लाईन थांबवा : नागरिकांचा उपोषणाचा इशारा
श्री क्षेत्र पंचाळेत सदगुरू गंगागिरी महाराजांचा 177 वा अखंड हरिनाम सप्ताह

अहमदनगर/प्रतिनिधी- स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून असे सोने घेण्यासाठी आलेल्यांना मारहाण करून लुटणार्‍यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने लुटणारी टोळी नगर तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी संयुक्त कारवाई करीत पकडली. पाचजणांची टोळी पोलिसांनी पकडली असून, त्यांच्या आणखी साथीदारांचा शोध सुरु आहे. या टोळीत एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. नगर तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (दि.3) संयुक्तपणे केलेल्या कारवाईत रामदास चंदर भोसले (रा.घोसपुरी, ता.जि.अ.नगर), परमेश्‍वर रविकांत काळे (रा.घोसपुरी, ता.जि. नगर), शिवदास रामदास भोसले (रा.घोसपुरी, ता. जि. अ.नगर), प्रतिक रामदास भोसले (रा.घोसपुरी ता जि.अ.नगर) अशा आरोपींना पकडले. अटक आरोपींना नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कारवाई नगर तालुका पोलिस करीत आहेत.

साडेसात लाखाला गंडा
याबाबतची माहिती अशी की मिलिंद कान्हाजी काशिद (जि.चंद्रपूर, सध्या रा. औरंगाबाद) या व्यक्तीला 20 जुलै 2021 रोजी नगर तालुक्यातील सारोळा कासार या गावामध्ये स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून अज्ञात दरोडेखोरांनी 7 लाख 50 हजार रुपयांना गंडा घातला होता. नगर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलिस उप निरीक्षक गणेश इंगळे, नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक धनराज जारवाल यांच्या नेतृत्वाखाली चार वेगवेगळी पथके तयार करुन या गुन्ह्यातील चार आरोपी व एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

नगर जिल्हा बदनाम
स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून परजिल्ह्यातील वा पर राज्यातील व्यक्तींना मारहाण करून त्यांनी सोने घेण्यासाठी आणलेले पैसे लुटण्याचे प्रकार नगर जिल्ह्यात होत असल्याने अशा गुन्ह्यांबाबत जिल्हा बदनाम आहे. कोपरगाव, श्रीगोंदे व नगर तालुका परिसरात असे गुन्हे वारंवार घ़ड़तात. घराचे खोदकाम करताना सोने सापडल्याचे सांगून पर जिल्ह्यातील वा पर राज्यातील लोकांना स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवले जाते. त्यावेळी त्यांना खरे सोने दिले जाते. त्याला भुलून ही मंडळी दरोडेखोरांनी सांगितलेल्या ठिकाणी बाकीचे सोने घ्यायला पैसे घेऊन आली की, त्यांच्यावर हल्ला करून त्यांना लुटले जाते. अशा लूटमार प्रकरणापैकी अनेक प्रकरणे बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांपर्यंत येतही नाहीत. पण त्यामुळे या घटना वारंवार घडत असून, याबाबत पोलिसांनी पर राज्यात व पर जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

COMMENTS