Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबासाहेब भोस यांची शरद पवार गटात घरवापसीचे संकेत

नागवडेंना होमग्राउंडवरच राजकीय धक्का बसणार ?

श्रीगोंदा शहर : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी नुकतीच खा. शरद पवार यांची भेट घेतल्याने त्यां

शिवसेनेकडून महापौर पदासाठी रोहिणी शेंडगे यांचा अर्ज दाखल l पहा LokNews24
ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासह सर्व सुविधा देऊ
प्रत्येकाची दिवाळी मंगलमय व गोड व्हावी यासाठी सामाजिक उपक्रमाची गरज – भूपेंद्र रासणे

श्रीगोंदा शहर : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी नुकतीच खा. शरद पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याची व जिल्ह्याची जबाबदारी दिलेल्या राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांना ’होमग्राऊंड’वरच मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
                    नागवडे कारखान्याच्या निवडणुकीपासून तालुक्यात नागवडे गटासोबत राहण्याची भूमिका बाबासाहेब भोस यांनी घेतली होती. त्याचवेळी आपण खा. शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहणार असल्याचे स्पष्ट करायला भोस विसरले नव्हते. मात्र, मागील महिन्यात अनुराधा व राजेंद्र नागवडेंनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी नागवडेंच्या आग्रहाखातर भोस यांनीही ’घड्याळ’ हाती घेतले. मात्र, बाबासाहेब भोस यांचे मन अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रमत नसल्याचे चित्र दिसत होते. मागील आठवड्यात नागवडेंनी आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांच्या सत्कार सोहळ्याचे नियोजित अध्यक्ष असतानाही भोस अनुपस्थित राहिले. तर नगर येथे झालेल्या जिल्हा राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे देखील बाबासाहेब भोस यांनी पाठ फिरविली होती त्यातच शुक्रवारी(दि.5) सायंकाळी जेष्ठनेते बाबासाहेब भोस यांनी खा. शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर उपस्थित होते. या भेटीमुळे भोस पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके हे भोस यांचे नातेवाईक आहेत. लोकसभा निवडणुकीत लंके यांना मदत करण्याची भोस यांची  भूमिका असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भोस यांचा शरद पवार गटात प्रवेश होण्याची अटकळ बांधली जात आहे.

रयत शिक्षण संस्थेतील  शिक्षकांच्या प्रश्‍नांसदर्भात खा. शरद पवार यांना भेटलो होतो. गुरुवारी (दि.11) पत्रकार परिषद घेऊन पूढील राजकीय भूमिका स्पष्ट करू.
बाबासाहेब भोस, उपाध्यक्ष, नागवडे कारखाना

COMMENTS