जामखेड : तालुक्यातील नान्नज येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका शेतकऱ्यावर लोखंडी रॉड व कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत चंद्रकांत कल्याण गोरे (वय ५०, रा. हाळवस्ती, नान्नज, ता. जामखेड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी रात्री घरासमोरील पटांगणात बाजेवर झोपलेल्या अवस्थेत असताना रात्री सुमारे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी गालावर जोरात चापट मारल्याने ते जागे झाले. त्यावेळी समोर यशदीप साळवे, सतीश साळवे, बाबा शेख व सद्दाम पठाण (पूर्ण नाव माहीत नाही) हे चौघे उभे असल्याचे त्यांना दिसले. फिर्यादीने चापट मारण्याचे कारण विचारताच यशदीप साळवे याने हातातील लोखंडी कोयत्याने कपाळावर वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर सतीश साळवे, बाबा शेख व सद्दाम पठाण यांनी लोखंडी रॉडने मारहाण करत “याला जिवंत सोडू नका,” असे म्हणत गंभीर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीने आरडाओरड केल्यानंतर आरोपी काळ्या रंगाच्या वाहनातून पसार झाले. जाताना “सुनिल भाऊंनी सांगितलेले काम झाले, आता हा १५ ते २० मिनिटांत मरेल,” असे बोलणे ऐकू आल्याचे फिर्यादीने जबाबात म्हटले आहे. आवाज ऐकून शेजारील नागरिक घटनास्थळी जमा झाले. जखमी अवस्थेत चंद्रकांत गोरे यांना प्रथम जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथील श्रीदिप हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. दरम्यान, फिर्यादीचा मुलगा ओम याचे ऑगस्ट २०२५ मध्ये नान्नज येथे साळवे कुटुंबाशी भांडण झाले होते. त्या प्रकरणात ओम, फिर्यादीचा जावई वैभव साबळे, त्याचा भाऊ सार्थक साबळे व वडील विजय साबळे हे सध्या जामखेड कारागृहात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक महिला पोलिस निरीक्षक वर्षा जाधव करीत आहेत.

जामखेड : तालुक्यातील नान्नज येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका शेतकऱ्यावर लोखंडी रॉड व कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत चंद्रकांत कल्याण गोरे (वय ५०, रा. हाळवस्ती, नान्नज, ता. जामखेड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी रात्री घरासमोरील पटांगणात बाजेवर झोपलेल्या अवस्थेत असताना रात्री सुमारे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी गालावर जोरात चापट मारल्याने ते जागे झाले. त्यावेळी समोर यशदीप साळवे, सतीश साळवे, बाबा शेख व सद्दाम पठाण (पूर्ण नाव माहीत नाही) हे चौघे उभे असल्याचे त्यांना दिसले.
फिर्यादीने चापट मारण्याचे कारण विचारताच यशदीप साळवे याने हातातील लोखंडी कोयत्याने कपाळावर वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर सतीश साळवे, बाबा शेख व सद्दाम पठाण यांनी लोखंडी रॉडने मारहाण करत “याला जिवंत सोडू नका,” असे म्हणत गंभीर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीने आरडाओरड केल्यानंतर आरोपी काळ्या रंगाच्या वाहनातून पसार झाले. जाताना “सुनिल भाऊंनी सांगितलेले काम झाले, आता हा १५ ते २० मिनिटांत मरेल,” असे बोलणे ऐकू आल्याचे फिर्यादीने जबाबात म्हटले आहे. आवाज ऐकून शेजारील नागरिक घटनास्थळी जमा झाले.
जखमी अवस्थेत चंद्रकांत गोरे यांना प्रथम जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथील श्रीदिप हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
दरम्यान, फिर्यादीचा मुलगा ओम याचे ऑगस्ट २०२५ मध्ये नान्नज येथे साळवे कुटुंबाशी भांडण झाले होते. त्या प्रकरणात ओम, फिर्यादीचा जावई वैभव साबळे, त्याचा भाऊ सार्थक साबळे व वडील विजय साबळे हे सध्या जामखेड कारागृहात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक महिला पोलिस निरीक्षक वर्षा जाधव करीत आहेत.

COMMENTS