श्रीरामपूर : कोपरगाव येथील कथालेखिका सौ. कल्पना हिरालाल महानुभाव यांचा विनोदी,ग्रामीण,उपहासगर्भ, दिखाऊ प्रवृत्तीवर प्रहार करणारा ’पोश्टर पैलवान’

श्रीरामपूर : कोपरगाव येथील कथालेखिका सौ. कल्पना हिरालाल महानुभाव यांचा विनोदी,ग्रामीण,उपहासगर्भ, दिखाऊ प्रवृत्तीवर प्रहार करणारा ’पोश्टर पैलवान’ हा कथासंग्रह प्रभावी असल्याचे मत श्रीरामपूर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे उपाध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील ग्रंथ वाचनालयात सौ. कल्पना महानुभाव यांच्या ’पोश्टर पैलवान’ कथासंग्रहावर मत व्यक्त करताना डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. प्रा. डॉ. हिरालाल केशरबाई अर्जुनराव महानुभाव यांनी डॉ. उपाध्ये यांचा तर सौ. कल्पना महानुभाव यांनी सौ. मंदाकिनी उपाध्ये यांचा सत्कार केला. कथालेखिका सौ.कल्पना महानुभाव यांनी कथासंग्रहाचा परिचय करून दिला. एकूण 16 कथा असलेला हा कथासंग्रह कोपरगाव येथील साईभूमी प्रकाशनने अतिशय सौंदर्यदायी आणि चित्रमयी स्वरुपात प्रकाशित केला आहे.कविवर्य नारायण सुमंत यांची प्रस्तावना आणि डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे समीक्षण मला सदैव प्रोत्साहन देणारे आहे. कुटुंब, कर्म, पाहुणी,सुखाचे सोबती, स्वच्छता अभियान, बाबा लगीन, निरुपयोगी आत्मचरित्र, आत्महत्येचा फसलेला एक प्रयोग, प्रवास, सोनू, शाळा, निवडणूक, न्याय, चिंता, गुन्हा, पोश्टर पैलवान या सर्वच कथा आजच्या अनुभवातून लिहिल्या आहेत. समाजशिक्षण आणि चांगले ते सांगावे या हेतूतून हे लेखन झाल्याचे सांगून त्यांनी या कथासंग्रहाच्या निर्मितीमध्ये महानुभाव, कविवर्य मंगेश पाडगावकर, कवयित्री ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई, कविवर्य नारायण सुमंत, मेघालीताई सुमंत, डॉ. बाबुराव उपाध्ये, संतोष तांदळे, गणेश ज्ञानेश्वर कानडे, मनोज साळुंखे अशा अनेकांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी महानुभाव दांपत्यांचा सत्कार करून आभार मानले.
डॉ. उपाध्ये यांचे शैक्षणिक, साहित्यिक योगदान मौलिक:- प्रा.डॉ.महानुभाव
प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव येथे झाला. त्यांचे रयत शिक्षण संस्थेत शैक्षणिक कार्य भूषणावह आहे, नगर जिल्ह्यात 1977 पासून साहित्यिक क्षेत्रात त्यांचे मौलिक योगदान आहे. सुमारे 65 पुस्तके ही त्यांची गुणवत्तापूर्ण निर्मिती आहे. पोश्टर पैलवान कथासंग्रहाला त्यांनी दिलेला समीक्षात्मक अभिप्राय प्रेरणादायी आहे, त्यामुळेच उपाध्ये उभयतांचा सत्कार करताना एक सत्कार्य केल्याची भावना असल्याचे मत प्रा. डॉ.अॅङ् हिरालाल महानुभाव यांनी व्यक्त केले.

COMMENTS