कोरोना लसीची तपासणी करणारी प्रयोगशाळा पुण्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना लसीची तपासणी करणारी प्रयोगशाळा पुण्यात

कोरोना लसींच्या उत्पादनाची तपासणी करणारी देशातील दुसरी प्रयोगशाळा लवकरच पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्रामध्ये (एनसीसीएस) सुरू होण्याची शक्यता आहे.

कमी पटसंख्यांच्या शाळाबंदीमुळे गरीब मुले वंचित राहण्याची भीती
अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करा : कृषिमंत्री दादाजी भुसे
कोकणात 15 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

पुणे/प्रतिनिधीः कोरोना लसींच्या उत्पादनाची तपासणी करणारी देशातील दुसरी प्रयोगशाळा लवकरच पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्रामध्ये (एनसीसीएस) सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय संस्थांच्या तज्ज्ञ पथकाने ’एनसीसीएस’ला भेट देऊन त्याबाबतची पाहणी केली. केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर परवानगी मिळाल्यास येत्या काळात सुमारे चार ते पाच प्रकारच्या कोरोना लसींच्या बॅचची तपासणी पुण्यातून होऊ शकेल. 

कोरोना लसींचे उत्पादन करण्याची परवानगी मिळालेल्या कंपन्यांना उत्पादन बाजारात आणण्याआधी लसीच्या प्रत्येक बॅचची तपासणी केंद्रीय प्रयोगशाळेकडून करून घ्यावी लागते. त्यासाठी प्रत्येक बॅचमधून ठरावीक प्रमाणात लसींचे नमुने घेतले जातात. लसींच्या या नमुन्यांची निश्‍चित केलेल्या मानकांनुसार तपासणी झाल्यावर, ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच लसींची संबंधित बॅच बाजारात येते; किंवा लसीकरणासाठी सरकारी यंत्रणेकडे पाठवली जाते. देशभरातील लसींच्या प्रत्येक बॅचच्या तपासणीचे काम सध्या हिमाचल प्रदेशच्या कसौली येथील ’सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरी’मार्फत (सीडीएल) केले जाते. आता या कामाची जबाबदारी पुण्यातील ’एनसीसीएस’कडेही येऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ’सेंट्रल ड्रग्ज स्टॅँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ (सीडीएससीओ), ’सीडीएल’; तसेच संबंधित यंत्रणेच्या राज्यातील अधिकार्‍यांच्या पथकाने ’एनसीसीएस’मधील संभाव्य प्रयोगशाळेच्या तयारीची पाहणी केली. यासंबंधीचा अहवाल लवकरच केंद्र सरकारला देण्यात येणार असून, केंद्राकडून परवानगी मिळाल्यावर पुढील काही महिन्यांत ’एनसीसीएस’मधील लस तपासणीची सुविधा सुरू होऊ शकेल. पुण्यातील ’सीरम इन्स्टिट्यूट’तर्फे सध्या कोव्हिशील्ड लसीचे उत्पादन केले जाते. येत्या काळात ’सीरम’तर्फे रशियाच्या ’स्पुटनिक व्ही’ आणि अमेरिकी ’नोव्हाव्हॅक्स’च्या भारतीय लसीचे ’कोव्हॅव्हॅक्स’चेही उत्पादन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ’भारत बायोटेक’च्या कोव्हॅक्सिनचे उत्पादनही येत्या काळात पुण्यातून सुरू होण्याची शक्यता आहे. पुण्यातून उत्पादित होणार्‍या या चार लसींच्या बॅचची तपासणी पुण्यातच होणे शक्य असल्यामुळे लस बाजारात आणताना वेळेची मोठी बचत होऊ शकेल.

COMMENTS