Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

मदर्स डे निमित्त गायकवाड परिवारात भावनिक स्नेहमेळावा

लातूर : आई म्हणजे ममत्वाची मूर्ती, त्यागाचे प्रतीक आणि प्रत्येक कुटुंबाचा आधारवड असते. तिच्या प्रेमात निस्वार्थ भावना, काळजी आणि संस्कारांची उब द

माफिया अन् मच्छर दोघांचाही खात्मा : योगी आदित्यनाथ  
कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही : पंतप्रधान मोदीभारताची ताकद त्याच्या संस्कृती, श्रद्धा आणि विचारांमध्ये
सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीकराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन


लातूर : आई म्हणजे ममत्वाची मूर्ती, त्यागाचे प्रतीक आणि प्रत्येक कुटुंबाचा आधारवड असते. तिच्या प्रेमात निस्वार्थ भावना, काळजी आणि संस्कारांची उब दडलेली असते. अशाच मातृप्रेमाचा सुंदर अनुभव मातृदिनानिमित्त लातूर येथील माजी खासदार प्रा. डॉ. सुनील गायकवाड, त्यांचे मोठे बंधू आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आईच्या भेटीसाठी लातूर येथे आले होते. त्यावेळी हा भावनिक स्नेहमेळावा आनंदाचा पर्वणी ठरतांना दिसून येत होता. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येत अत्यंत प्रेमळ, जिव्हाळ्याच्या आणि भावनिक वातावरणात मातृदिन साजरा करण्यात आला.
डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी आईच्या आवडीच्या विविध रंगांच्या पारंपरिक इरकल साड्या भेट म्हणून दिल्या. मुलाकडून मिळालेल्या या प्रेमळ भेटीने आईच्या चेहर्‍यावर आनंद आणि समाधान झळकले. तिच्या डोळ्यांतील ममत्व आणि मुलांबद्दलचा अभिमान पाहून उपस्थितांचे मनही भावूक झाले. या विशेष प्रसंगी प्रा. डॉ. सुनील गायकवाड, विजयकुमार गायकवाड, मुलगी पुष्पलता यांच्यासह संपूर्ण परिवार उपस्थित होता. सर्वांनी एकत्र येत मातृदिनाचा आनंद साजरा केला. घरामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि कौटुंबिक एकतेचे वातावरण निर्माण झाले होते. आईसोबत जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेक भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. परिवारातील सदस्यांनी आईच्या त्याग, कष्ट आणि संस्कारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आईचा आशीर्वाद हा आयुष्यातील सर्वात मोठा आधार असतो. जीवनात कितीही यश मिळाले तरी आईसमोर प्रत्येक जण कायम लेकरूच राहतो, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. साधेपणातही नात्यांचा गोडवा आणि कुटुंबातील एकोप्याचे दर्शन घडवणारा हा मातृदिन सोहळा उपस्थितांच्या मनात कायमची आठवण बनून राहिला. प्रेम, संस्कार आणि ममत्वाचा संदेश देणारा हा आनंदसोहळा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.

COMMENTS