Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ड्रेनेजच्या गॅसने चक्कर येऊन मजुराचा मृत्यू

छ. संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगरमधील जिन्सी भागातील तेलंगणा वस्तीमध्ये ड्रेनेजलाइनचे काम करण्यासाठी मजुरांनी चेंबरचे झाकण उघडले. झाकण उघडताच त्या

वज्रमुठ महाविकास आघाडी विराट जाहीर सभा स्थळ ठिकाणी आज चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते स्तंभ पूजन 
मूर्खाच्या नंदनवनात वावरणारा संजय राऊत त्याला भाव देऊ नका
कडक उन्हाळ्यातही शहर वासियांना चार दिवसांनतर पाणी

छ. संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगरमधील जिन्सी भागातील तेलंगणा वस्तीमध्ये ड्रेनेजलाइनचे काम करण्यासाठी मजुरांनी चेंबरचे झाकण उघडले. झाकण उघडताच त्यातून विषारी गॅसचा भपका आला. हा गॅस नाकातोंडात गेल्याने 27 वर्षीय तरुण मजूर चक्कर येऊन पडून डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला. या तरुणाला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अविनाश रमेश खंडागळे (27, रा. गांधीनगर) असे मृताचे नाव आहे.

COMMENTS