Oplus_16908288 पाथर्डी : आजचा बालक हा उद्याच्या उज्ज्वल भारताचा प्रगतशील नागरिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ दर्जेदार शिक्षण न देता, समाजामध

पाथर्डी : आजचा बालक हा उद्याच्या उज्ज्वल भारताचा प्रगतशील नागरिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ दर्जेदार शिक्षण न देता, समाजामधील हरवत चाललेल्या माणूसपणाची जाणीव करून दिली पाहिजे. त्यांच्यातील ‘माणूस’ घडवण्याची जबाबदारी शिक्षकांबरोबरच पालकांचीही तितकीच महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण उपसंचालक डॉ. ज्योती परिहार यांनी केले.
पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित, श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी (प्राथमिक व माध्यमिक विभाग) येथे नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांनी उत्साहात पार पडला. याप्रसंगी डॉ. परिहार बोलत होत्या.
यावेळी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड म्हणाले की, पालकांनी विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील तर त्या शालेय प्रशासनाकडे वेळच्या वेळी मांडल्या पाहिजेत. तर संस्थेचे विश्वस्त कुणाल आव्हाड यांनी पालकांनी संस्थेवर टाकलेल्या विश्वासाला शाळा व प्रत्येक घटक कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकास साधण्यासाठी वर्षभर विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून विविध सहशालेय उपक्रम राबवले जातील, असेही त्यांनी सांगितले.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय (पुणे) येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी बाबुराव जाधव, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, प्राचार्य डॉ. बी. ए. चौरे, मुख्याध्यापक शरद मेढे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके, मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी, पर्यवेक्षक संपत घारे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुजा कुलकर्णी यांनी केले, स्वागत शरद मेढे यांनी केले. सूत्रसंचालन आशा बांदल व गार्गी तरवडे यांनी केले, तर आभार ज्ञानेश्वर गायके यांनी मानले.

COMMENTS