केडीएमसी उभारणार आता स्वतःचीच जलतपासणी प्रयोगशाळा 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडीएमसी उभारणार आता स्वतःचीच जलतपासणी प्रयोगशाळा 

कल्याण प्रतिनिधी - दूषित पाण्यामुळे आपल्याला दरवर्षी विविध आजारांना सामोरं जावं लागते. काविळ, मलेरिया टायफॉइड, गॅस्ट्रोसारखे आजार पसरण्याचा सर्वाधि

शाळेत गेलेल्या पालकांना महिला बाऊन्सर्सनी धु धु धुतलं | LOKNews24
पुणे मुंबई लेन एक्स्प्रेसवे वर भीषण अपघात.
निवडणूक प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी हे आयोगाचे वैशिष्ट्य : मुख्य निवडणूक आयुक्त

कल्याण प्रतिनिधी – दूषित पाण्यामुळे आपल्याला दरवर्षी विविध आजारांना सामोरं जावं लागते. काविळ, मलेरिया टायफॉइड, गॅस्ट्रोसारखे आजार पसरण्याचा सर्वाधिक धोका असतो. या पार्श्वभमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने आता स्वतःचीच सुसज्ज अशी जल तपासणी प्रयोगशाळा उभारण्याची तयारी सुरू केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरांची संख्या सुमारे पंधरा लाखांहून अधिक झाली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करणे आणि त्यातही नागरिकांना होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता कायम राखणे हे केडीएमसी प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. नागरिकांना पुरवले जाणारे पाणी हे कितपत शुद्ध आहे, त्यामध्ये काही विषाणूंचा प्रादुर्भाव तर नाही ना आदी गोष्टी तपासण्यासाठी दर एक दिवसाआड पाण्याचे नमुने गोळा करून कोकण भवन येथील शासनमान्य प्रयोगशाळेत पाठवले जातात. मात्र त्याचे अहवाल येण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन दिवसांचा अवधी लागत असल्याने पाण्याच्या गुणवत्तेची माहिती मिळण्यासाठी केडीएमसी प्रशासनाला वाट पाहावी लागते. विशेषतः पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने केडीएमसी प्रशासनाला पाणी पूरवठयाबाबत अधिक सतर्क राहावे लागते. मात्र पाण्याच्या गुणवत्तेचे अहवाल प्राप्त होण्यास लागणारा विलंब पाहता केडीएमसी प्रशासनाने आता स्वतःचीच सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्याची तयारी सुरू केल्याची माहिती शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली. तसेच केडीएमसीकडून आतापर्यंत केला जाणारा पाणीपुरवठा हा शुद्धच असतो. मात्र त्याच्या वेळोवेळी केल्या जाणाऱ्या तपासण्या, दूषित पाण्याद्वारे आजार पसरवणाऱ्या विषाणूंची माहिती, पाण्यातील क्लोरीनसह इतर घटकांचे प्रमाण योग्य आहे की नाही याबाबत वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे केडीएमसीकडून ही सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे

COMMENTS