Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करुणा मुंडे बीडमधून लोकसभेची निवडणूक लढणार

बीड ः राज्यात लोकसभा निवडणुकीपूर्वीच हायहोल्टेज लढतीचे संकेत मिळत आहे. बारामतीनंतर आता बीडमध्ये देखील वेगळीच लढत बघायला मिळू शकते. कारण  मंत्री ध

उमेदवारी अर्ज पहिला कोण घेणार?…टॉसवर झाला निर्णय ; मनपा पतसंस्थेची निवडणूक पहिल्या दिवसापासून चर्चेत
एफटीआयच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन केली आत्महत्या.
कामगार कपातीचे सावट

बीड ः राज्यात लोकसभा निवडणुकीपूर्वीच हायहोल्टेज लढतीचे संकेत मिळत आहे. बारामतीनंतर आता बीडमध्ये देखील वेगळीच लढत बघायला मिळू शकते. कारण  मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात गंभीर आरोप करत खळबळ उडवून देणार्‍या त्यांच्या पत्नी करुणा मुंडे-मुंडे पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत बीडमधून भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे.

COMMENTS