Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पश्‍चिम रेल्वेवर आठवी वातानुकूलित लोकल धावणार

मुंबई : पश्‍चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर येत्या मार्चपूर्वी प्रवाशांसाठी आणखी एक वातानुकूलित लोकल दाखल होणार आहे. त्यामुळे पश्‍चिम रेल्वेच्या ताफ्

हार्ट कट ड्रेसमुळे उर्फी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
अर्थसंकल्पातून पायाभूत सोयी-सुविधांवर भर
आरआरआर फेम अभिनेते रे स्टीवेन्सन यांचे निधन

मुंबई : पश्‍चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर येत्या मार्चपूर्वी प्रवाशांसाठी आणखी एक वातानुकूलित लोकल दाखल होणार आहे. त्यामुळे पश्‍चिम रेल्वेच्या ताफ्यातील वातानुकूलित लोकलची संख्या आठवर पोहोचेल. सध्या या लोकलच्या चाचण्या सुरू असल्याची माहिती पश्‍चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.

पश्‍चिम रेल्वेवर डिसेंबर 2017 मध्ये पहिली वातानुकूलित लोकल धावली. सुरुवातीला या लोकलला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र तिकीट दरात कपात होताच प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. सध्या पश्‍चिम रेल्वेवर दररोज 79 वातानुकूलित लोकल फेर्‍या होत आहेत. सध्या पश्‍चिम रेल्वेकडे सात वातानुकूलित लोकल असून ‘उपकरणे लोकल डब्याखाली’ असलेली वातानुकूलित लोकल नुकतीच मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या लोकलची गेल्या अनेक महिन्यांपासून चाचणी सुरू होती. आता लवकरच आठवी वातानुकूलित लोकलही पश्‍चिम रेल्वेवर दाखल होणार आहे. मध्यंतरी सहा डबे वातानुकूलित आणि सहा डबे विनावातानुकूलित अशी एकूण बारा डब्यांची अर्ध वातानुकूलित लोकलचा प्रयोग सुरू होता. त्यासाठी चेन्नईतील रेल्वे कारखान्यात आकाराला आलेली बारा डब्यांची एक वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल झाली होती. या रेल्वेचे सहा वातानुकूलित डबे काढून त्याऐवजी सहा विनावातानुकूलित डबे जोडण्यात आले आणि या गाडीची चाचणी पश्‍चिम रेल्वेवर करण्यात आली. हा प्रयोग अयशस्वी झाला आणि संपूर्ण वातानुकूलित लोकल चालवण्यावरच शिक्कामोर्तब झाले. 

COMMENTS