Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोकणात 15 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला असतांना, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत.

राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे
राज्यात उद्यापासून जोरदार पाऊस

मुंबई : उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला असतांना, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. राज्यामध्ये जुलैमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर कमी काळात पडलेला जास्त पाऊस किंवा राज्याच्या एका विभागात पडलेला अतिरिक्त पाऊस उर्वरित राज्याची पावसाची सरासरी भरून काढण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. अशात हवामान खात्याकडून आता पुन्हा राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकणसह आता विदर्भालाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे घाट माथा आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी माहिती आहे. दरम्यान, खरंतर विकेंडमध्ये कोकणाला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. यामुळे कोकण वगळता राज्यात इतरत्र पावसाचा जोर कमी असल्याचं पाहायला मिळेल.

COMMENTS