Homeताज्या बातम्या

शिर्डी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘कलाकार’ची चर्चा; पुणतांब्याच्या प्रवीण जोगदंडला ‘परीक्षक विशेष पुरस्कार’

कोपरगाव : साई पालखी फिल्म्स आणि आरजी-७ स्टुडिओज यांच्या वतीने साईनगरीत प्रथमच आयोजित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय लघुपट प्रदर्शन व भव्य पारितोषिक

३८ कोटींच्या वसुलीची साखर आयुक्तांकडे मागणी; ‘गणेश’ कारखान्याचा गंभीर आरोप, चौकशीची मागणी
पर्यावरणदिनानिमित्त ठाकरे सेनेकडून तुळशी रोपांचे वाटप    
राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी दीपक पटवर्धन; काका कोयटे यांची कार्यकारी अध्यक्षपदी एकमताने निवड

कोपरगाव : साई पालखी फिल्म्स आणि आरजी-७ स्टुडिओज यांच्या वतीने साईनगरीत प्रथमच आयोजित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय लघुपट प्रदर्शन व भव्य पारितोषिक वितरण सोहळा २४ मे रोजी उत्साहात पार पडला. महाराष्ट्रासह राज्याबाहेरील तब्बल ५२ हून अधिक चित्रपट या महोत्सवात सहभागी झाले होते.

या महोत्सवात पुणतांबा येथील उदयोन्मुख कलाकार प्रवीण जोगदंड याने सादर केलेला ‘कलाकार’ हा नऊ मिनिटांचा लघुपट विशेष चर्चेचा विषय ठरला. कलाकाराच्या जीवनावर आधारित या चित्रफितीतील प्रभावी संवाद आणि आशयपूर्ण मांडणीमुळे उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. प्रवीण जोगदंड याच्या या अनोख्या कलाकृतीची दखल घेत त्याला प्रसिद्ध अभिनेते किशोर अग्रवाल यांच्या हस्ते ‘परीक्षक विशेष पुरस्कार’ (Jury Special Award) देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्यास जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते, त्यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले. याप्रसंगी रंगभूमीवरील अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्यानंतर प्रवीण जोगदंड याने आयोजक मधुकर कर्डक, रंगराव घागरे आणि सागर पतंगे यांचे आभार मानले. त्याच्या या यशाबद्दल ऍड. राहुल शेळके, सरपंच डॉ. धनंजय धनवटे, अनिल नळे आणि प्रताप वहाडणे यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS