Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीला वेग; हजारो पदांसाठी संधीचे दरवाजे उघडणार

पुणे : राज्यातील शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी शिक्षक भरती प्रक्रियेला लवकरच गती मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा परिषद तसेच खासगी शा

आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी JEE-NEET चाळणी परीक्षा उत्साहात 
सर्वोदय विद्यामंदिरला तीन लाखांचे शैक्षणिक साहित्य
सौ.के.एस.के. महाविद्यालयाची डिपेक्स 2026 विज्ञान प्रदर्शनास शैक्षणिक भेट

पुणे : राज्यातील शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी शिक्षक भरती प्रक्रियेला लवकरच गती मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांमधील रिक्त शिक्षक पदे एका सुसूत्र आणि पारदर्शक प्रणालीद्वारे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रक्रियेसाठी ‘पवित्र पोर्टल’चा वापर करण्यात येणार असून, त्यामुळे भरतीतील अनियमितता कमी होऊन पात्र उमेदवारांना संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या पातळीवर झालेल्या बैठकीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर चर्चा करताना ही माहिती पुढे आली. भरतीपूर्वी बिंदूनामावलीचे प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. यानुसार, संबंधित संस्थांनी आपल्या रिक्त पदांची माहिती देण्यापूर्वी मागासवर्गीय कक्ष व विभागीय आयुक्त कार्यालयाकडून बिंदूनामावलीची खातरजमा करून घेणे आवश्यक राहील. त्यानंतरच ही पदे पोर्टलवर नोंदवली जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या पोर्टलद्वारे भरलेल्या पदांनाच शासन मान्यता देण्यात येणार असून, भविष्यातील वेतनही अशाच पदांना लागू होणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि उत्तरदायी होईल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्‍नावरही शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. अशा शिक्षकांचे समायोजन आता संगणकीय प्रणालीद्वारे पारदर्शक पद्धतीने केले जाणार आहे. तसेच अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित पदे भरण्याची प्रक्रिया देखील वेगाने राबवली जात आहे. प्राप्त प्रस्तावांपैकी मोठ्या प्रमाणावर मंजुरी देण्यात आली असून, उर्वरित प्रस्तावांतील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही संरचनात्मक बदलांचाही विचार सुरू आहे. जिल्हा परिषदांच्या केंद्र शाळांचे समूह शाळांमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. तसेच ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे, तेथे दहावीपर्यंत वर्ग सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. एकूणच, शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता, शिस्त आणि विश्‍वासार्हता निर्माण करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. बिंदूनामावलीचे प्रमाणीकरण आणि केंद्रीकृत पोर्टलद्वारे भरती या उपाययोजनांमुळे खर्‍या अर्थाने पात्र उमेदवारांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. राज्यातील हजारो तरुणांसाठी ही भरती प्रक्रिया आशेचा किरण ठरणार आहे.

COMMENTS