Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी JEE-NEET चाळणी परीक्षा उत्साहात 

अकोले : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर अंतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात येणारी जेईई व नीट प्रवेशाची चाळणी परीक्षा सावरचोळ (ता. संगमनेर) येथे यशस्वीरीत्या पार पडली.  शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, सावरचोळ येथे आयोजित या परीक्षेसाठी राजूर प्रकल्पांतर्गत एकूण ३२२ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी जेईईसाठी १३३ व नीटसाठी १२२ असे एकूण २५५ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित राहिले. परीक्षेसाठी १४ हॉलमध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.  आदिवासी विकास विभागामार्फत दरवर्षी एसएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्तरावर ही चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे प्रत्येक विभागातून ६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च शासनाकडून उचलला जात असून, आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.  परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी भोजन, स्वच्छ पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. अपर आयुक्त कार्यालय, नाशिक येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस. डी. सुडके यांनी परीक्षाकेंद्राला भेट देऊन पाहणी केली.  प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिपक कालेकर, आंबादास बागुल व शिवराज कदम यांनी केंद्रप्रमुख म्हणून काम पाहिले. आदिनाथ सुतार यांनी परीक्षा विभागप्रमुख, तर नवनाथ गायकवाड यांनी केंद्र समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच कुलदीप पाटील, डी. बी. घाडगे व एस. आर. गजरे यांनी सहाय्यक म्हणून कार्य केले. 

देवळाली प्रवरात ‘श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज’ यात्रोत्सव
स्व. कोल्हेंच्या पुण्यस्मरणानिमित्त राहात्यात विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
गारपीटग्रस्त भागांची खा. नीलेश लंकेंकडून पाहणी; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र ; तातडीच्या मदतीची मागणी

अकोले : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर अंतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात येणारी जेईई व नीट प्रवेशाची चाळणी परीक्षा सावरचोळ (ता. संगमनेर) येथे यशस्वीरीत्या पार पडली.

 शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, सावरचोळ येथे आयोजित या परीक्षेसाठी राजूर प्रकल्पांतर्गत एकूण ३२२ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी जेईईसाठी १३३ व नीटसाठी १२२ असे एकूण २५५ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित राहिले. परीक्षेसाठी १४ हॉलमध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

 आदिवासी विकास विभागामार्फत दरवर्षी एसएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्तरावर ही चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे प्रत्येक विभागातून ६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च शासनाकडून उचलला जात असून, आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

 परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी भोजन, स्वच्छ पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. अपर आयुक्त कार्यालय, नाशिक येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस. डी. सुडके यांनी परीक्षाकेंद्राला भेट देऊन पाहणी केली.

 प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिपक कालेकर, आंबादास बागुल व शिवराज कदम यांनी केंद्रप्रमुख म्हणून काम पाहिले. आदिनाथ सुतार यांनी परीक्षा विभागप्रमुख, तर नवनाथ गायकवाड यांनी केंद्र समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच कुलदीप पाटील, डी. बी. घाडगे व एस. आर. गजरे यांनी सहाय्यक म्हणून कार्य केले. 

COMMENTS