Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भांबोरा येथील सौर प्रकल्पाविरोधात आंदोलन; प्रांताधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित

कर्जत : भांबोरा परिसरात शेतकऱ्याला विश्वासात न घेता सुरू असलेल्या सौर प्रकल्पाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान होत असल्याचा आरोप करत व

खर्ड्यामध्ये कांद्याच्या पिकात अफूची शेती; दोघांविरोधात गुन्हा ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
सर्वोदय विद्यामंदिरला तीन लाखांचे शैक्षणिक साहित्य
माळीवाडा वेस न पाडता तिचे जतन करावे; खा. लंके यांची केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

कर्जत : भांबोरा परिसरात शेतकऱ्याला विश्वासात न घेता सुरू असलेल्या सौर प्रकल्पाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान होत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी च्या युवा आघाडीच्या वतीने कर्जत येथील प्रांत अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाने दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते ऍड.अरुण जाधव, दिलीप हिर भगत, वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, संजय शेलार, दत्ता भालेराव, विकास समुद्र, संजय साळवे, आप्पा सरोदे, गोदड समुद्र, सुरज सातव, चंद्रकांत डोलारे, राहुल अडसूळ, धनंजय काळे, दिनेश पवार, काजूरी पवार, पुनम काळे, विजय शिंदे, डॉ. अन्सार शेख, फुले संभाजी, मंडलिक रामकृष्ण यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.यावेळी बोलताना एडवोकेट अरुण जाधव म्हणाले की, भांबोरा येथील गट नंबर ४५७, ४५६, ४०७, ४६१, 462, 463 यामधील शेतकरी दिलीप हिरभगत आणि काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून सौर प्रकल्पासाठी विद्युत वाहक तारा टाकण्याचे काम सुरू असून हे काम शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू करण्यात आले. तसेच या कामामुळे शेतजमिनींचे नुकसान होत असून भविष्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी संबंधित कंपनी पोलीस प्रशासनासह दडपशाही करत आहे आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. संबंधित कंपनीने सौर प्रकल्पाच्या वाहक तारा जमिनीच्या वरच्या बाजूने न घेता अंडरग्राउंड पद्धतीने घ्याव्यात अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी व शेतकरी यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले.प्रांताधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

COMMENTS