संजय राऊत मोकाट सोडलेलं बोकड 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत मोकाट सोडलेलं बोकड 

संजय गायकवाड यांची संतप्त प्रतिक्रिया

बुलढाणा प्रतिनिधी  - आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांना सडेतोड उत्तर दिलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाब

संजय राऊतांना जामीन मिळताच सुषमा अंधारे झाल्या भावुक अन् डोळ्यात पाणी
टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावे लागेल: संजय राऊत (Video)
राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

बुलढाणा प्रतिनिधी  – आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांना सडेतोड उत्तर दिलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. ५० रेडे परत गुवाहाटीला जात असल्याचं वक्तव्य करत राऊतांनी पुन्हा शिंदे गटावर निशाणा साधला होता., रेडे असा उल्लेख केल्यामुळे संजय गायकवाड चांगलेच संतापले. राऊतांच्या या टीकेवरूनच संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. “संजय राऊत यांनी ५० रेडे गुवाहाटीला चालले आणि आमचे सुदर्शन चक्र त्याचा नायनाट करेल, अशी भाषा वापरली. ते आम्हाला रेडेच म्हणत असतील तर कदाचित आम्ही ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या रेड्यांच्या तोंडून वेद बोलावले असतील तो हिंदुत्वाचा वेद म्हणणारे रेडे नक्कीच आहोत. सजंय राऊत मोकाट बोकड आहेत” अशी टीकाही संजय राऊतांनी टीका केली आहे.

COMMENTS