Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कडक टाळेबंदी पाळणे सर्वांच्या हिताचे : नगराध्यक्ष वहाडणे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर किमान १५ दिवस संपुर्ण कडकडीत लॉकडाऊन पाळणे अत्यंत गरजेचे आहे.

संगमनेरमध्ये श्रीराम नवमी उत्सव उत्साहात
उद्योजक अजित सुरपुरिया यांचे निधन
खासदार लोखंडे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न

कोपरगाव शहर प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर किमान १५ दिवस संपुर्ण कडकडीत लॉकडाऊन पाळणे अत्यंत गरजेचे आहे.किराणा,भाजीपाला बंद झाल्यानंतर जनतेची अडचण होणार आहे यात शंका नाही.पण आज कोरोना वाढीचा वेग व मृत्युचे प्रमाण बघता आपणच कठोर निर्णय घेऊन प्रत्येकाचा जीव सुरक्षित ठेवला पाहिजे. 

राजकिय दबावामुळे आज सुरू असलेला लॉकडाऊन प्रभावी ठरलेला दिसत नाही.काही व्यवहार सुरू असल्याने लोक घराबाहेर पडणार व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणारच आहे.१००% संचारबंदी-व्यवहार बंदी हाच एकमेव उपाय सध्या तरी दिसतो. दवाखाने,औषधें -लॅब-सर्व वैद्यकीय सेवा अती आवश्यकच आहेत.सकाळी ११ वाजेपर्यंतच दुध विक्री व्हावी. सर्वांच्याच कितीही अडचणी वाढणार असल्या तरीही सहन करावे लागणार आहे.अन्यथा कोरोनामुळे कुणाचा कधी  घात होईल हे सांगताच येत नाही. गरीब-सर्वसामान्य कुटुंबातील कुणी कोरोनामुळे ऍडमिट झाले तर घरदारच विकावे लागेल इतके महागडे उपचार करावे लागतात. अशावेळी त्या परिवाराला कोण आर्थिक मदत करणार.आज सर्व शासकिय यंत्रणा तोकडी पडत आहे.बेड नाहीत,ऑक्सिजन नाही,इंजेक्शन नाहीत असे संकट आजच आहे.यानंतर अजून भयावह परिस्थिती येऊ शकते.कारण अनेक शासकिय अधिकारी-कर्मचारीच कोरोनामुळे जायबंदी झालेत.यंत्रणाच कोसळून पडली तर काय?  नागरिकांचे जिवीत सुरक्षित रहावे म्हणून मी माझे मत मांडले आहे.अशा काळात राजकिय विचार न करता सर्वांनी एकजुटीने कोरोना विरोधात लढले पाहिजे.

हॉस्पिटल-मेडिकल-लॅब-वैद्यकीय सुविधा-दुध वगळता इतर सर्व व्यवहार किमान १५ दिवस १०० %बंद ठेवावेत.असे माझे मत आहे.

तरीही केवळ नागरिकांना जास्त अडचणीचे होऊ नये म्हणून आठवड्यातून फक्त एक दिवस दर मंगळवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत किराणा-भाजीपाला व्यवसाय सुरू ठेवावेत मागील वर्षाप्रमाणे  अनेक समाजसेवक,स्वयंसेवी संस्था,संघटना,सहकारी संस्था,नेते,राजकिय पक्ष गरजूंना फुड पॅकेट देऊन आधार देऊ शकतात. मी सुचविले तेच करा असे मी म्हणूही शकत नाही.पण येणारी वेळ भयानक असणार असेच चित्र आहे.केंद्र शासन-राज्य शासन-सर्व यंत्रणा रात्रंदिवस राबत असतांना एक नागरिक म्हणून अशा संकटात तरी आपण स्वतःहून काही निर्णय  घेणे,नियम-कायदे-सूचना पाळणे महत्वाचे ठरणार आहे.आपल्या पैकी कुणीही कोरोनाच्या लाटेत सापडू नये याच हेतूने मी हे सर्व जाहिर केले आहे.ज्यांची असे करायला मान्यता नसेल त्यांनाबळजबरी करण्याचा मला अधिकार नाही हेही मी जाणतो. पण आपल्या सर्वांचे जीवित सुरक्षित रहावे यासाठी नागरिकांनी,लहान मोठ्या व्यावसायिकांनी माझ्या मताचा गंभीरपणे विचार करावा ही  विनंती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.

COMMENTS