Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नोकियाने केलेली चूक इंटेल’ही करतेय का ?

 जगातील चिप बनवणारी आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेली इंटेल ने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कपातीचे धोरण आखले आहे. जगातल्या सर्व आयटेक क्षेत्रा

नगरमध्ये दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या
‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर कडकडाट! ३ दिवसांत ३७ कोटींची कमाई; चित्रपट करमुक्त करण्यासाठी अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
ओबीसी आरक्षणासाठी समताचा एल्गार ; नगरला रस्ता रोको आंदोलनात झाली निदर्शने

 जगातील चिप बनवणारी आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेली इंटेल ने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कपातीचे धोरण आखले आहे. जगातल्या सर्व आयटेक क्षेत्रातील कंपन्यांना हा एक प्रकारे इशारा आहे. अर्थात, एआय टूल्स आल्यानंतर जागतिक पातळीवर हायटेक क्षेत्रातील कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे, होतो आहे. इंटेल सारख्या कंपनीने देखील एकेकाळी नोकिया सारख्या कंपनीने जी चूक केली होती; तशीच काहीशी चूक इंटेलची देखील होऊ घातली आहे. जगातल्या सर्व मोबाईल उत्पादक कंपन्यांनी अँड्रॉइड तंत्रज्ञान वापरण्याला सुरुवात केली होती; परंतु, छोट्या मोबाईल मध्ये उत्पादनाची मक्तेदारी आणि गुणवत्ता असलेल्या नोकियाने अँड्रॉइड तंत्रज्ञान स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे, एका रात्रीत नोकियासारखी कंपनी होत्याची नव्हती झाली होती. सध्या इंटेलला तसा धोका नसला तरी, एआय सारख्या क्षेत्रांमध्ये त्यांनी इतर कंपन्यांपेक्षा मागे राहण्याचा जो धोका आहे, तो धोका त्यांच्या भोवती आता मोठ्या प्रमाणात गुरफटायला लागला आहे. कंपनीला तोटा होण्याची जी प्रक्रिया आहे, ती ए आय तंत्रज्ञानातून निर्माण झाली आहे. कारण, ‌एआयच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इंटेल मागे पडली आहे आणि त्यामुळे इंटेल सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीने आपला नफा वाचवण्यासाठी किंबहुना आपला उद्योग नफ्यात ठेवण्यासाठी जे धोरण अवलंबलं, ते धोरण म्हणजे कर्मचारी कपात. कर्मचारी कपाताच्या धोरणांमध्ये त्यांनी प्रशासकीय आणि अभियांत्रिकी अशा दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात, २०२५ च्या अखेरीस इंटेल या कंपनीतून जवळपास २५ हजार कर्मचाऱ्यांची कपात होईल. एक लाख पेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या या कंपनीमध्ये जर एवढी कपात झाली, तर, डिसेंबर अखेरपर्यंत या कंपनीकडे केवळ ७५ हजार कर्मचारी राहतील. जगभरातील २५ हजार अभियंत्यांना  किंवा तंत्रज्ञांना कंपनी वाऱ्यावर सोडणार आहे. अर्थात, हे केवळ एआय टूल्स किंवा या तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामातून  झालं असलं तरी, त्यावर अजूनही कंपनीला योग्य तो तोडगा सापडलेला नाही. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत एआय तंत्रज्ञानाच्या कंपन्यांनी जी आता मक्तेदारी मिळवायला सुरुवात केली आहे; त्यामध्ये, इंटेल आता काहीसा मागे पडलेला आहे. यामुळे जागतिक आयटी क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे. इंटेलच्या कर्मचाऱ्यांची संख्या सध्या जवळपास १ लाखाच्यावर आहे. परंतु आर्थिक अडचणीमुळे ही संख्या आता ७५ हजार पर्यंत खाली येणार आहे. या निर्णयाचा उद्देश कंपनीला आर्थिकदृष्ट्या बळकट करणे आणि खर्च कमी करणे आहे. इंटेलसह अनेक टेक कंपन्या जागतिक मंदी, सप्लाय चेन अडचणी आणि एआय क्षेत्रातील बदलत्या प्राथमिकता, यामुळे अडचणीत आहेत. या कपातीचा प्रभाव जगभरातील कामगारांवर पडण्याची शक्यता आहे. जागतिकीकरणातील ही नवी प्रक्रिया जी आहे, ती जगातल्या सर्वच उद्योगांना नोकर कपातीपर्यंत घेऊन जात आहे. याचा अर्थ एआयचं प्राथमिक दर्शन तरी जगभरात बेरोजगारी निर्माण करणार आहे. या बेरोजगारीवर आगामी काळात कशी मात करावी, या संदर्भात जगातल्या सर्व शासक सत्तांना जनतेला आणि विचारवंतांना एकत्रितपणे विचार करावा लागेल. कारण, जगातली माणसे तरली तरच जग सुरक्षित राहू शकत. हा सिद्धांत  कधीही नाकारता येणार नाही. त्यामुळे तंत्रज्ञान हे आता माणसांच्या एकूणच जीवनमानावर परिणाम करणारे ठरत असलं तरी, ते वरदान कसं राहील किंवा ठरेल या दिशेने आता मानवी समाजसमुहाला विचार करावा लागेल.

COMMENTS