Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ कार्यक्रमात कोपरगावकर झाले लोटपोट

तहसीलच्या विस्तीर्ण मैदानावर तुफानी हास्याचे उडाले फवारे

कोपरगाव प्रतिनिधी : सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर मोहिनी घातली असून याच कार्यक्रमातील कलाकारा

आमच्याकडे एकापेक्षा एक सरस जाधव ; मंत्री थोरातांचा भास्कर जाधवांना टोला
अकोले तालुक्यात शेतकर्‍याने घेतले काळ्या गव्हाचे उत्पादन
डॉ. काळे करणार दर मंगळवारी ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी

कोपरगाव प्रतिनिधी : सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर मोहिनी घातली असून याच कार्यक्रमातील कलाकारांनी कोपरगावकरांना देखील ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ या कार्यक्रमात पोट धरून हसायला लावले. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त आ. आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने सोमवार (दि.03) रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या मैदानावर ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या नियोजित वेळेनुसार रसिकांनी तहसील कार्यलयाच्या मैदानाची वाट धरून काही वेळात संपूर्ण मैदान गर्दीने फुलून गेले होते. सुप्रसिद्ध विनोदी कलाकार समीर चौगुले, चेतना भट, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे/संबेराव, वनिता खरात, रोहित माने (सावत्या) यांचे उत्तम अभिनय, खुमासदार विनोद, नव्या पिढीचे सुप्रसिद्ध गायक अंजली गायकवाड, चैतन्य देवरे यांच्या सुरेल आवाजातील गाणी व त्या जोडीला सिनेस्टार, सुप्रसिद्ध नृत्यांगना, रील स्टार माधुरी पवार हिच्या बहारदार नृत्याने कोपरगावकरांची मने जिंकून घेतली. ठसकेबाज लावण्यांवर देखणा नृत्याविष्कार व विनोदाच्या हास्याचे फवारे आणि त्याला शिट्ट्या-टाळ्यांची भरभरून मिळालेली दाद अशा जल्लोषी वातावरणात ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ अलोट गर्दीत उत्साहात संपन्न होवून कोपरगावकरांनी विनोदाचा गारवा अनुभवला. तत्पूर्वी पंचायत समिती प्रांगणातील कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, आ. यशवंत माने, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, आ.मनोहर चंद्रिकापुरे, आ. निलेश लंके, आ. किरण लहामटे, लोकनेते बाबुराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विक्रांत पाटील, मा.आ.भानुदास मुरकुटे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे, संतोष माने, डॉ. सुगत चंद्रिकापुरे आदी मान्यवरांसह माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायण मांजरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे आजी, माजी संचालक, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्‍वर झाडबुके, चैत्राली जाधव यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी आभार मानले.

कोपरगाव आणि पारनेरचे कौटुंबिक नाते आहे. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी पारनेरमध्ये आमदार म्हणून काम केले. पारनेरचे रयत सेवक सांगतात आम्हाला काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेत मध्ये नोकरी दिली. त्यामुळे कोपरगाव बरोबरच पारनेर मध्ये देखील अनेक संसार साहेबांनी उभे केले आहेत. साहेब फक्त कोपरगावचे आधारस्तंभ नव्हते तर पारनेरचे देखील आधारस्तंभ होते.  आ. निलेश लंके

 मतदार संघाची विकासाच्या बाबतीत झालेली वाताहत, कोपरगाव शहराला चेष्टेने धुळगाव संबोधले जाणे. त्यामुळे मी मनाशी निश्‍चय केला होता. मला कोपरगावच्या विकासासाठी लढायचं, कोपरगावचा विकास करायचा. मला कोपरगाव बदलायचं असून कोपरगावची ओळख बदलायची आहे. त्यादृष्टीने केलेल्या माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मागील तीन वर्षात 1500 कोटी व सरकार बदलल्यानंतर देखील 550 कोटी असा जवळपास दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी मतदार संघासाठी आणला आहे. आमदार आशुतोष काळे  

COMMENTS