Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात लवकरच येणार स्कायबस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुणे ः पुण्यात वाहतुकीची नेत्याचीच समस्या आहे. शिवाय पुण्यातील आयटी पार्क आणि हिंजवडी परिसरातील कंपन्यांमध्ये पोहचण्यासाठी अनेकांना तारेवरची कसरत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 
ठाण्यातील श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व संत संमेलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार !

पुणे ः पुण्यात वाहतुकीची नेत्याचीच समस्या आहे. शिवाय पुण्यातील आयटी पार्क आणि हिंजवडी परिसरातील कंपन्यांमध्ये पोहचण्यासाठी अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते, मात्र यावर तोडगा निघणार असून, या आयटी कंपन्यांमध्ये पोहचण्यासाठी स्कायबस हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रोला पूरक सेवा मिळेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
स्कायबसची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच या प्रकल्पाचे भूमिपुजन केले जाईल, अशी माहितीफडणवीसांनी दिली आहे. त्यासोबतच पुणे कॅन्टॉन्मेट बोर्डाचे सर्व प्रश्‍न सोडवले जातील आणि सगळ्या तरतुदी पाहून निधीसाठी पाठपूरावा करुन बैठक घेतली जाईल, असे अश्‍वासनही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. पुणे शहरात 24/7 पाणी पुरवठा योजना, नदी सुधार कार्यक्रम यासारख्या विविध प्रकारच्या योजना राबवून विकास कामांच्या माध्यमातून शहराचे चित्र बदलण्याचे काम सुरु आहे. पीएमपीएलच्या माध्यमातून देशातील पहिली इलेक्ट्रीक बसची फ्लिट पुणे शहरात केली आहे. पुण्याचे या मॉडेलची देशात अंमलबजावणी करण्यात येत असून विविध शहराने ते स्वीकारले आहे. मेट्रोचे कामे अतिशय गतीने करण्यात येत आहे. सिव्हील कोर्ट ते स्वागेट मेट्रोचे मुठा नदीच्या गर्भातून भुयारी चाचणी घेण्यात आली असून येत्या काळात मेट्रोचे तीन्ही मार्ग मिळून एकूण 54 कि.मीचे मेट्रोचे जाळे सुरु करण्यात येत आहे. येत्या वर्षभरात टाटाच्या मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. पुण्यातील रिंग रोडमुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए क्षेत्रात विकासाच्या नवीन संधी तसेच अडीच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था नव्याने निर्माण होणार आहे, हा मार्ग येत्या काळात पुण्याच्या विकासाचे ते इंजिन ठरेल, असा विश्‍वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

COMMENTS