Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जातेगाव दरोडा प्रकरणातील दरोडेखोर जेरबंद

पुणे ः पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरातील जातेगावमध्ये एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा निर्घृण खून करून जबरदस्तीने दागिने लुटणार्‍या दरोडेखोरांना पु

‘मविआ’ ची वज्रमूठ सेैल
एसटीचा संप चिघळला ; अनिल परबांच्या घरावर फेकली शाई
जेईई मेन्स परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा केला गौरव

पुणे ः पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरातील जातेगावमध्ये एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा निर्घृण खून करून जबरदस्तीने दागिने लुटणार्‍या दरोडेखोरांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आरोपीकडून चौकशीत पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
याप्रकरणी टोळीप्रमुख अविनाश उर्फ लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे (वय -28, रा. कोळगाव मोहरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), प्रवीण दीपक भोसले (वय 21, रा. जातेगाव फाटा, ता. शिरुर, जि. पुणे) या आरोपींना अटक करण्यात आली. तसेच याबाबत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात देखील घेण्यात आले आहे. अविनाश काळे याच्याविरुद्ध दरोडा, घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे 15 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. 24 एप्रिल रोजी शिक्रापूर परिसरातील जातेगाव बुद्रुक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी काळे, भोसले आणि अल्पवयीन साथीदारांना मयत महिलेच्या घरात जबरी दरोडा टाकला होता. आरोपींनी कृष्णाबाई ज्ञानेश्‍वर इंगवले (वय 76) यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील दागिने जबरदस्तीने लुटले होते. मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.

COMMENTS