Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामपंचायत जिंकण्याचा पक्षीय दावा चूकीचा ! 

महाराष्ट्रात ७ हजार पेक्षा पेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज दुपारपर्यंत जवळपास स्पष्ट झाला. यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भारत

एव्हढी आदळ आपट कशासाठी?
राजस्थान आरोग्याधिकार देणारे देशातील पहिले राज्य !
ग्लोबल स्लेवरी : एक धक्कादायक वास्तव ! 

महाराष्ट्रात ७ हजार पेक्षा पेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज दुपारपर्यंत जवळपास स्पष्ट झाला. यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचा कब्जा झाला किंवा दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस ने आपले स्थान राखले, असे बातम्यांमधून पेरले गेले असले तरी, ग्रामीण भागातील एक वास्तव आहे की, राजकीय पक्षाच्या नावावर निवडणूका लढवता येत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका या केवळ पॅनेलच्या आधारे होतात. अर्थात पॅनलमध्ये असणारे लोक वेगवेगळ्या पक्षाचे असू शकतात; परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाला स्थान नसते. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेला किंवा पक्षांना या विजयाचे श्रेय देणे हे अनाठायी आहे. तसे पाहिले तर ग्रामपंचायत निवडणुकांच्या विजयानंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. गुजरात भाजपचे प्रमुख असणारे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती मानले जाणारे गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील हे मूळचे महाराष्ट्राचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. मात्र, महाराष्ट्रात त्यांच्या कन्या राहत असलेल्या गावात जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे त्यांची कन्या निवडून आली असली तरी त्यांच्या पॅनलचा पराभव झाला. दुसऱ्या बाजूला शिवसेना हा राजकीय पक्ष या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्षांच्या क्रमामध्ये पाचव्या स्थानावर असल्याचे म्हटले जात आहे.

त्याच वेळी अतिशय वादग्रस्त असणारे परंतु तितकेच लोकप्रिय असणारे कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासुबाई देखील या निवडणुकीत सरपंच पद जिंकून आले आहेत.  त्याबरोबरच आम आदमी पक्षाने देखील भंडारा जिल्ह्यातील पाथरी या गावात त्यांचा सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. अर्थात कोणत्याही पक्षाने दावा केला तरी ग्रामपंचायत निवडणुका या पक्षनिहाय होत नसल्याने या निवडणुकांचे श्रेय पक्षाला देणे, योग्य नाही किंवा पक्षांच्या संदर्भात या निवडणुका होतात, असे म्हणणे देखील चुकीचे आहे. त्याचबरोबर निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातीलच टाकळी गावात दगडफेकीची घटना होऊन धनराज माळी या युवकाचे निधन झाले आहे. अर्थात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आचारसंहितेनुसार विजयी झालेल्या पॅनलच्या उमेदवारांना विजय मिरवणूक काढता येत नाही. परंतु गेल्या काही काळापासून निवडणूक आयोगाचा निवडणुकींवर नियंत्रण किंवा वचक राहिल्याचे जाणवत नाही. अशा वेगवेगळ्या घटनाक्रम महाराष्ट्रातील सात हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीनंतरच्या निकालाच्या दिवशी दिसून आल्या. परंतु या निवडणुकांचे विश्लेषण करताना बऱ्याच जणांनी पक्षनिहाय आकडेवारी सादर करण्याचा प्रयत्न केला. 

निवडणूक आयोग या संदर्भात अशा प्रकारची आकडेवारी जाहीर करीत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने जाहीर न केलेली आकडेवारी ही अधिकृत नसते. म्हणूनच अमुक पक्षाला एवढ्या जागा मिळाल्या, एवढी सरपंच पदे मिळाली, हे म्हणणच  निवडणूक कायद्याच्या अनुषंगाने आणि आचारसंहितेच्या अनुषंगानेही अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे हा चुकीचा पायंडा पाडून लोकांच्या भावना अधिक उत्तेजित करण्याचं काम राजकीय पक्षांनी करू नये, ही या निवडणुकीच्या निमित्ताने अपेक्षा आहे. ग्रामपंचायत निवडणुका या ग्रास रूट च्या अतिशय मूलभूत निवडणुका असल्यामुळे आणि कुठलाही संघर्ष हा गाव पातळीवरून अधिक संवेदनशील राहत असल्यामुळे, राजकीय पक्षांनी या निवडणुकांचे भांडवल करून आपली शक्ती अधिक असल्याचे किंवा आपली शक्ती वाढल्याचं किंवा आपण या निवडणुका जिंकल्याचा दावा करू नये. लोकशाही व्यवस्थेच्या अतिशय ग्रास रूटवर असणाऱ्या या निवडणुकीच्या निमित्ताने निवडून आलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांचे अभिनंदन करीत असताना, आपल्या जबाबदारीच्या आणि कर्तव्याचेही भान राखतील, अशी अपेक्षा करूया!

COMMENTS