Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित्र अन् कृषिपंपांचे नुकसान टाळण्यासाठी कॅपॅसिटर बसवा ; महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन

अहिल्यानगर : कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहक ऑटोस्विच बसवतात. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भा

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांचे पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन
शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ? एक्स-रे टेक्निशियन गायब, सेवकाकडूनच एक्स-रे काढल्याचा धक्कादायक प्रकार
विक्रमसिंह पाचपुते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारे आमदार : रासकर

अहिल्यानगर : कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहक ऑटोस्विच बसवतात. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टाळण्यासाठी तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा यासाठी शेतकर्‍यांनी कृषिपंपांना ऑटोस्विच टाळून सोबत कॅपॅसीटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

      प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसवणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा  व चांगला उपाय आहे. कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती  कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास कॅपॅसिटरमुळे मदत होणार आहे. मात्र बहुतांश ग्राहकांनी कृषिपंपांना कॅपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली असल्याने ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत, असे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे. कृषिपंपास कॅपॅसिटर बसवल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होऊन योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात.ऑटोस्विचचा वापर टाळामहावितरणकडून कृषिपंपांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी काही ठिकाणी शेतकरी कृषिपंपांना ’ऑटोस्विच’ लावतात. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाच वेळी वाढत असल्याने रोहित्र  जळण्याचे किंवा  नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढू शकते. गरजेच्या काळात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. त्यामुळे कृषिपंपांना कॅपॅसीटर बसवून सोबत ऑटो स्वीचचा वापर टाळावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

COMMENTS