Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदगाव, मुडेगाव येथे कामगंध सापळे लावण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न

अळीवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे लावा : शिवप्रसाद येळकर

अंबाजोगाई प्रतिनिधी- कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत नांदगाव, मुडेगाव येथे शेतीशाळा घेऊन उपविभागीय  तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी

सोन्याच्या खाणीत 27 कामगारांचा होरपळून मृत्यू
स्टेट बँकेचा शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आधार : कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील
भाजपने एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय करू नये

अंबाजोगाई प्रतिनिधी- कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत नांदगाव, मुडेगाव येथे शेतीशाळा घेऊन उपविभागीय  तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी सोयाबीनवरील खोडमाशी, पिवळा मोझॅक विषाणू प्रादुर्भाव, अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळी झालेली पाने यांची निरीक्षणे दाखवून व्यवस्थापनाचे उपाय सुचवले. घरच्या घरी अल्प खर्चात चिकट सापळे तयार करणे तसेच कीड व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबोळी अर्क तयार करणे बाबत माहिती देऊन शेतीशाळा वर्गाच्या प्रक्षेत्रावर कामगंध सापळे लावण्याचे तांत्रिक प्रशिक्षण दिले. कामगंध सापळ्यामध्ये नुकसानकारक अळीच्या मादीचा गंध असलेल्या गोळ्या (ल्युर) लावल्या जातात त्यामुळे नर पतंग सापळ्याकडे आकर्षित होऊन अडकतो यामुळे प्रजनन कमी होऊन अंडी घालण्याची क्रिया रोखुन किडींचे व्यवस्थापन होते याची माहिती दिली. शत्रू किडींच्या आगमनाचे वेळीच संकेत मिळवणे आणि नर पतंगाचा नायनाट करून किडींची संख्या शेतामध्ये कमी करणे, अश्या दुहेरी फायद्यासाठी एक एकर मध्ये सोयाबीन पिकासाठी दहा हेली ल्युर आणि दहा स्पोडो ल्युर तसेच कापूस पिकामध्ये एकरी दहा पेक्टीनो ल्युर कामगंध सापळे लावण्याचा सल्ला येळकर यांनी दिला. पिवळा मोझॅक विषाणूग्रस्त झाडे शेतकर्‍यांना दाखवून व्यवस्थापनासाठी रोगग्रस्त झाडे शेतामधून काढून नष्ट करणे पांढर्‍या माशीचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले तसेच कामगंध सापळे, बायोमिक्सचा वापर या जैविक पद्धतींचा वापर करून कीड रोग व्यवस्थापन करावे आणि मित्र कीटकांच्या संवर्धनासाठी रासायनिक कीडनाशकांचा अतिरेकी वापर टाळावा असे आवाहन येळकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
गोगलगायी निदर्शनास येत असतील तर शेतामध्ये 7 ते 8 मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे ढीग ठेवावेत. गोगलगायी दिवसा त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्यास्तापूर्वी त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून नष्ट करावी. गोगलगायीच्या रासायनिक व्यवस्थापनासाठी मेटाल्डिहाईड (2.5 टक्के) गोळ्या – 1 कि.ग्रॅ. प्रति एकर प्रमाणे बांधाच्या कडेने व शेतामध्ये फेकाव्यात. सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पीक पिवळे पडल्यास सुक्ष्म अन्नद्रव्य महाराष्ट्र ग्रेड-2 ची 50 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.  रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी एकरी 60 पिवळे चिकट सापळे लावावेत.  पिवळा मोझॅक विषाणू रोगग्रस्त झाडे शेतातून काढून जाळून टाकावीत.  मावा, पांढरी माशी, तुडतुडे, खोडमाशी, चक्रीभुंगा, अळीवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% अधिक लँबडा सायहॅलोथ्रीन 4.6% झेडसी (5 मिली) प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. शिवप्रसाद येळकर, तंत्रज्ञान समन्वयक उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय अंबाजोगाई.

COMMENTS