Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

लडाखमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; ३ लष्करी अधिकारी थोडक्यात बचावले

लडाख : लडाखमधील लेह जवळील तांगस्ते भागात भारतीय लष्कराचे 'चिता' हे हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातातून लष्कराचे ३ वर

बारामतीमध्ये पुन्हा विमान अपघात; तांत्रिक बिघाडामुळे शेतात कोसळले प्रशिक्षणार्थी विमान, सुदैवाने जीवितहानी टळली
पाकिस्तानी मालवाहू विमान बेपत्ताअरबी समुद्रात शोधमोहीम; चालक दलातील पाच जणांचा समावेश
जळगावमध्ये धावत्या रेल्वेला लागली आग
लडाखमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तिघे थोडक्यात  बचावले | Saamana (सामना)

लडाख : लडाखमधील लेह जवळील तांगस्ते भागात भारतीय लष्कराचे ‘चिता’ हे हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातातून लष्कराचे ३ वरिष्ठ अधिकारी थोडक्यात बचावले आहेत. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे घडला? याबाबत लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत.

अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे तीन वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. यामध्ये लेफ्टनंट कर्नल, मेजर आणि जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) सचिन मेहता यांचा समावेश होता. या अपघातात हेलिकॉप्टरमधील तिघेही जखमी झाले असले तरी त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

अपघातानंतरचा ‘सेल्फी’ सोशल मीडियावर व्हायरल लेह जवळील तांगस्ते भागात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर एका अधिकाऱ्याचा सेल्फी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अपघाताच्या छायेतून सुखरूप बाहेर पडल्यानंतर, कोसळलेल्या हेलिकॉप्टरजवळ इतर दोन अधिकाऱ्यांसोबत बसलेले मेजर जनरल सचिन मेहता यांचा हा फोटो असल्याचे सांगितले जात आहे. हा फोटो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेने दिले आहे.

अपघाताच्या चौकशीचे आदेश तांगस्ते परिसरात झालेल्या या हेलिकॉप्टर अपघाताची लष्कराकडून अधिकृत चौकशी केली जाणार आहे. तांत्रिक बिघाड की खराब हवामान, यासह सर्व संभाव्य कारणांची तपासणी करण्यासाठी लष्कराने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश दिले आहेत.

COMMENTS