Homeदेश

वॉशिंग्टन बनले जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 व्या वर्षानिमित्त 4 जुलै रोजी राजधानी वॉशिंग्टनमध्ये सुमारे 40 मिनिटे भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्या

 समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आ.संजय गायकवाड आले धावून
कोल्हापूरच्या माजी महापौरांचे थेट महापालिकेच्या दारातच अभ्यंगस्नान
पंढरपुरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या


वॉशिंग्टन : अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 व्या वर्षानिमित्त 4 जुलै रोजी राजधानी वॉशिंग्टनमध्ये सुमारे 40 मिनिटे भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या उत्सवानंतर हवेत मोठ्या प्रमाणात धूर आणि सूक्ष्म प्रदूषक कण मिसळल्याने काही काळासाठी वॉशिंग्टन हे जगातील प्रमुख शहरांमध्ये सर्वाधिक प्रदूषित हवेचे शहर ठरल्याची नोंद झाली. जागतिक हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणार्‍या आयक्यूएअर या संस्थेच्या माहितीनुसार, प्रदूषणाची तीव्रता हळूहळू कमी होत गेल्यानंतर रविवारी संध्याकाळपर्यंत शहराचा क्रमांक जागतिक प्रदूषण यादीत 26 व्या स्थानावर घसरला.
हवेतील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचल्याने स्थानिक प्रशासनाने ’लाल इशारा’ जारी केला. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच दीर्घकाळ उघड्या वातावरणात राहणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, श्‍वसनाचे विकार, हृदयविकार किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रदूषणाचा परिणाम केवळ संवेदनशील गटांपुरता मर्यादित नसून निरोगी व्यक्तींनाही श्‍वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि थकवा जाणवू शकतो. परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करताना अधिकार्‍यांनी, आजची हवा म्हणजे सिगारेट ओढत लांब पल्ल्याची शर्यत धावण्यासारखी आहे, अशी उपमा दिली. उष्णतेची तीव्र लाट आणि फटाक्यांमधून निर्माण झालेल्या प्रदूषणाचा एकत्रित परिणाम आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS