Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी पक्ष

दोन्ही गटातील आमदार पात्र विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा निर्णय

मुंबई ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर हा पक्ष कुणाचा असा सवाल उपस्थित होत होता. अखेर विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर हा पक्ष अजित

स्वपक्षीय राजकारण : अंतर्विरोध आणि स्पर्धा!
मोदींच्या बांगला देश दौर्‍यात आचारसंहितेचे उल्लंघनः ममता
राज्य गारठले ; पिकांचे मोठे नुकसान ; उत्तर, मध्य पश्‍चिम, दक्षिण महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल

मुंबई ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर हा पक्ष कुणाचा असा सवाल उपस्थित होत होता. अखेर विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर हा पक्ष अजित पवार गटाचा असल्याचा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर गुरूवारी विधानसभा अध्यक्षांनी देखील विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊन अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या निर्णयाने शरद पवार गटाला धक्का बसला असून, या निर्णयाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.

नार्वेकरांनी निकाल देतांना शिवसेना आमदारांबाबत दिलेल्या निर्णयाचा दाखला दिला. दरम्यान निकालाचे वाचन होत असताना शरद पवार गटाकडून एकही आमदार उपस्थित नव्हता. फक्त एक वकील उपस्थित होता. राहुल नार्वेकर यांनी एकूण 5 याचिकांवर निर्णय दिला. याचिकेतून राहुल नार्वेकर यांनी दोन स्वतत्र निर्णय दिले. मूळ पक्ष आपला असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात आल्याचे नार्वेकर म्हणाले. आमदार अपात्र करण्याआधी आधी मूळ पक्ष कोण आहे ते ठरवावे लागेल, असे म्हणत नार्वेकरांनी आधी राष्ट्रवादी कोणाची हा निर्णय दिला. निकालाचे वाचन करताना राहुल नार्वेकरांनी विविध मुद्दे मांडले. राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणात निरीक्षण नोंदवले. विधीमंडळ सदस्यांची संख्या पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे 41 आमदारांचे पाठबळ आहे. पक्षीय रचना पाहता कुठला गट हा राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतो. हे प्रथमदर्शनी सांगता येणार नाही. पण विधीमंडळ गटाचे पाठबळ पाहता अजित पवार गट हाच राजकीय पक्ष असल्याचे निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं. त्यामुळे अजित पवार गटाचीच राष्ट्रवादी खरी असल्याचा निर्वाळा नार्वेकरांनी दिला. पक्ष कुणाचा? याचा निकाल जाहीर केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला. याबाबतच्या दाखल सर्व याचिका रद्द करत नार्वेकरांनी अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र असल्याचा निर्वाळा दिला. शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळ्या. यावेळी राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले. आमदार अपात्रेताच निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी अतिशय महत्त्वाचे निरीक्षण नोंदवतांना म्हटले की, नवनवीन पक्षांसोबत आणि विचारसरणी सोबत सध्या युती आणि आघाडी होत आहे. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर 10 व्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. अजित पवार आणि शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे 10 व्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नसल्याचे, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी निर्णय देतांना सांगितले.

अध्यक्षपदासाठी दोन समांतर नेतृत्वाचा दावा – राष्ट्रवादी काँगे्रस पक्षासंदर्भात निकाल देतांना नार्वेकर म्हणाले की, अध्यक्षपदाची निवड घटनेला धरुन नाही, असा दावा दोन्ही गटाकडून कऱण्यात आला. 29 जून 2023 पर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान नव्हतं. पण 30 जून 2023 रोजी दोन जणांकडून अध्यक्ष असल्याचा दावा आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे दिले. दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले. प्रतिनिधिंच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आले नाहीत. पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.त्यामुळे विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊन मूळ पक्ष हा अजित पवार गटाचा असल्याचा निर्वाळा नार्वेकरांनी दिला आहे.

COMMENTS