Homeताज्या बातम्याबीड

गोळेगाव येथे श्री कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्थेचे उद्घाटन22 मे रोजी हभप इंदुरीकर महाराजांचे हरिकिर्तन

गेवराई तालुक्यातील श्री कानिफनाथ गड, मौजे गोळेगाव येथे वारकरी परंपरेतून बालकांना सुसंस्कारित करण्याच्या उद्देशाने श्री कानिफनाथ वारकरी शिक्षण संस

पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल शनिचरणी
तर्कशक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगमह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवपद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने व अभिनेत्री मेघना झुझम यांच्या हस्ते सन्मान
द्रौपदी सोळंके यांच्या तेरावीनिमित्त रविवारी कीर्तन सेवेचे आयोजनह.भ.प.वासुदेव बाबा टाकळीकर यांचे कीर्तन



गेवराई तालुक्यातील श्री कानिफनाथ गड, मौजे गोळेगाव येथे वारकरी परंपरेतून बालकांना सुसंस्कारित करण्याच्या उद्देशाने श्री कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली असून, संस्थेच्या उद्घाटनानिमित्त शुक्रवार दि. 22 मे रोजी रात्री 8 ते 10 या वेळेत समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे हरिकिर्तन आयोजित करण्यात आले आहे.
ख्यातनाम मृदंग वादक हभप अंकुश महाराज काळे यांच्या पुढाकारातून सुरू होत असलेल्या या संस्थेमध्ये बालकांसाठी मोफत बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 01 मे ते शनिवार दि. 23 मे या कालावधीत हे शिबिर सुरू असून, विद्यार्थ्यांना वारकरी संस्कार, अध्यात्म, कीर्तन, भजन व सांस्कृतिक मूल्यांचे मार्गदर्शन केले जात आहे. तसेच शनिवार दि. 23 मे रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत हभप मधुसुधन महाराज गवारे (माऊली संस्थान, राजापूर फाटा) यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. मृदंग अलंकार गुरूवर्य विष्णूपंत लोंढे गुरुजी यांच्या गुरुपूजन सोहळ्यानिमित्त या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार, संत-महंत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या धार्मिक व संस्कारमय कार्यक्रमाचा लाभ गेवराई तालुक्यातील महिला, पुरुष व युवकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मृदंग विशारद हभप अंकुश महाराज काळे तसेच प्रसिद्ध बालकिर्तनकार चैतन्य महाराज राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

COMMENTS