वडवणी तालुक्यातील चिंचवन येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिवपुराण कथेला रविवारी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. यावेळी सुप्रसिद्ध कथाकार ह.भ.प.

वडवणी तालुक्यातील चिंचवन येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिवपुराण कथेला रविवारी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. यावेळी सुप्रसिद्ध कथाकार ह.भ.प. विक्रमजी महाराज चिलगर यांचा हार घालून सत्कार करण्यात आला तसेच ग्रंथपूजन करून शिवपुराण कथेची विधिवत सुरुवात करण्यात आली.
या शिवपुराण कथेसाठी चिंचवनसह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने भक्तिमय झाला होता. यावेळी आयोजक ह.भ.प. अशोक महाराज कदम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपल्या परिसरात एवढा मोठा शिवपुराण महोत्सव प्रथमच होत असून त्यासोबत भव्य-दिव्य बाल सुसंस्कार शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये बाल कीर्तनकारांची कीर्तने होणार असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास मंकावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक बालाजी कोठुळे सर, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज कोठुळे, प्रा. शिवाजीराव कोठुळे, पांडुरंग मात्रे, बाबू अण्णा कोठुळे, भरत महाराज दोडताले, वसुदेव आप्पा कोठुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS