Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उष्णतेचा प्रकोप वाढतोय; बीडसह मराठवाड्यात सतर्कतेचे आवाहन – आपत्कालीन मदत कक्ष सज्ज

बीड : राज्यात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून बीडसह मराठवाडा भागात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे

पंजाबमध्ये बस अपघातात सहा जणांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; खोपोलीजवळ दोन ट्रकचा भीषण थरार, २ जणांचा जागीच मृत्यू!
मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडून वैद्यकीय मदत कक्षाचे कौतुक..!

बीड : राज्यात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून बीडसह मराठवाडा भागात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्र हा उष्णतेच्या दृष्टीने संवेदनशील राज्यांपैकी एक असून उष्णता कृती आराखड्यानुसार विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही जिल्हे अत्यंत जोखमीचे मानले गेले आहेत.
लातूर, नांदेड, जळगाव या जिल्ह्यांबरोबरच बीड जिल्ह्यातही उष्णतेचा तीव्र परिणाम जाणवत असून प्रशासन सतर्क झाले आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्यभर नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आले असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यात आली आहे. नागरिकांसाठी विविध हेल्पलाईन क्रमांक कार्यरत आहेत. जिल्हा नियंत्रण कक्ष (1077), रुग्णवाहिका सेवा (108), पोलिस मदत (112 / 100) तसेच राज्य नियंत्रण कक्ष (1070) हे क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. याशिवाय आरोग्य, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभागांचे नियंत्रण कक्षही सतत कार्यरत आहेत. उष्णतेमुळे उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलके व सैल कपडे परिधान करावेत, तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी यांनी विशेष दक्षता घ्यावी. ग्रामीण भागात शेतमजुरांसाठी सावली व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबत तहसीलदार चंद्र शेळके म्हणाले, प्रत्येक नागरिकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासन पूर्णतः सज्ज असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी त्वरित संपर्क साधावा. शासनाच्या सूचनांचे पालन केल्यास आपण या उष्णतेच्या संकटावर मात करू शकतो. एकूणच, प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच या उष्णतेच्या संकटावर नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS