Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भरधाव कारची 3 वाहनांना धडक; चिमुकलीसह तिघे जखमी

नाशिक प्रतिनिधी - कॉलेज रोडवर भरधाव वेगातील कारने तीन कारला धडक दिल्याची घटना शनिवारी (ता. 19) रात्री आडेअकराच्या सुमारास घडली. या विचित्र अपघा

शेतमजुरांना नेणारा पिकअप उलटला.
पुणे-नाशिक महामार्गावर पिकअप पलटी.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू

नाशिक प्रतिनिधी – कॉलेज रोडवर भरधाव वेगातील कारने तीन कारला धडक दिल्याची घटना शनिवारी (ता. 19) रात्री आडेअकराच्या सुमारास घडली. या विचित्र अपघातामध्ये एका कारमधील दोन वर्षांची चिमुकली, तिचे वडील व वॉचमन असे तिघे जखमी झाले असून, तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कॉलेज रोडवर प्रि. टी. ए. कुलकर्णी सिग्नल आहे. याच सिग्नलवरून येवलेकर मळ्याकडे भरधाव कार (एमएच 02, एवाय 1824) जात होती. कारचालक अभिषेक अजय शिंपी (वय 26, रा. नाशिक) याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने तीन कारला धडक देत अपघात केला. या अपघातामध्ये एका कारमधील स्वामी हरिशंकर बॅनर्जी (रा. सीरिन मिडोज), त्यांची दोन वर्षांची मुलगी लिओना बॅनर्जी व त्यांचा वॉचमन त्र्यंबक पगार हे तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस घटनास्थळी पोचले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित कारचालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. या अपघातात एमएच 15 डीसी 1020, एमएच 15 एचव्ही 4325 आणि एमएच 15 जीएफ 5846 या तीन कारचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारने तीन कारला धडक दिल्याची घटना शनिवारी (ता. 19) रात्री आडेअकराच्या सुमारास घडली. या विचित्र अपघातामध्ये एका कारमधील दोन वर्षांची चिमुकली, तिचे वडील व वॉचमन असे तिघे जखमी झाले असून, तीन वाहनांचे नुकसान झाले आहे.

COMMENTS