Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिंचोली कुस्ती मैदानात ’कौतुक’ ची बाजी, आत्मलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजन

चिंचोली : मैदानात प्रथम कुस्ती जोडताना नामदेवराव मोहिते, राम सारंग, डी. आर. जाधव, संपतराव जाधव व मल्ल. (छाया : आनंदा सुतार, खुजगांव.) शिराळा / प्र

रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील यांची आज पुण्यतिथी
इस्लामपुरात पंतप्रधानांनी साधला नव मतदारांशी ऑनलाईन संवाद
शामगाव येथे लोकसहभागातून महिला कुस्ती संकुल

शिराळा / प्रतिनिधी : चिंचोली (ता. शिराळा) येथील झालेल्या कुस्ती मैदानात प्रथम लढतीत कौतुक डाफळे यांनी मुन्ना झुंजूरके यांच्यावर घिसा डावावर विजय मिळविला. दुसर्‍या लढतीत अक्षय मंगवडे व शुभम सिध्दनाळे कुस्ती बरोबरीत सोडविली. तिसर्‍या लढतीत अरुण बोंगार्डे याने विक्रम घोरपडे यांच्यावर गुणांवर विजय मिळविला. अभिजित भोसले व सिध्दू धायगुडे कुस्ती बरोबरीत सोडवली. अमर पाटील याने अक्षय शिंदे यांच्यावर विजय मिळवला. दत्ता बानकर याने पवन भांदिगरे यांच्यावर विजय मिळविला. मैदानात शंभराहून अधिक कुस्त्या झाल्या.
विजयी मल्ल : धैर्यशील सकटे, मयूर जाधव, ओंकार जाधव, अभिजित बानकर, शुभम पाटील, विवेक जाधव, तुषार जाधव यांचा समावेश आहे. तसेच प्रल्हाद जाधव, वसंतराव जाधव, तानाजी जाधव, बाजीराव जाधव, ज्ञानदेव जाधव, रंगराव जाधव, शरद पाटील, प्रदीप जाधव, दिनेश जाधव, राहुल जाधव यांनी पंच म्हणून तर जोतिराम वाझे, अरुण कुमार सकटे, संजय जाधव यांनी निवेदक म्हणून काम पाहीले. मैदानासाठी युवा नेते रणधीर नाईक, सम्राट महाडीक, कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष डी. आर. जाधव, डॉ. नंदकुमार पाटील, उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव, उपसभापती बी. के. नायकवडी, ऑलम्पिक वीर बंडा पाटील, हिंदकेसरी दिनानाथ सिंह, पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, नारायण पाटील, माजी सरपंच फत्तेसिंग पाटील, उपसरपंच सुरेश जाधव उपस्थित होते. जोतिराम वाझे, संजय जाधव, अरुण कुमार सकटे यांनी निवेदन केले.

COMMENTS