Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण ः आ. थोरात

संगमनेर ः मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे .सुख समाधान व शांतीसाठी सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे हा संदेश देणारा नाताळ हा सण असल्याचे प्रत

बोगस बियाणेप्रकरणी कंपन्यांवर कारवाई का नाही ?
Sangamner : नांदुर ते बावपठार, माहुली रस्त्याची दुर्दशा (Video)
थोरातांकडे येणार प्रदेश काँगे्रसची सुत्रे ?

संगमनेर ः मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे .सुख समाधान व शांतीसाठी सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे हा संदेश देणारा नाताळ हा सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून नाताळ व नवीन वर्षानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सुदर्शन निवासस्थानी गाणी येशू जन्माची या कार्यक्रमानंतर शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्ष  दुर्गाताई तांबे, विश्‍वासराव मुर्तडक, प्रा बाबा खरात, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. थोरात म्हणाले की, मानवता हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. शांती व समानता ही जगाची सर्वात मोठी गरज असून येशू ख्रिस्ताने दया, क्षमा, शांतीचा संदेश दिला आहे. समाजातील गरीब, वंचित यांना मायेने ख्रिस्ताने जवळ केले. आचार, विचार याचबरोबर शत्रूलाही प्रेमाने जिंकण्याचे सामर्थ्य त्यांनी सर्वांना दिले. जागतिक पातळीवर नाताळ हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. बंधुभाव जपताना प्रत्येक मनुष्यावर प्रेम करा हा मोलाचा संदेश त्यांनी सर्वांना दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर डॉ. तांबे म्हणाले की, प्रत्येक माणसाने रागावर नियंत्रण मिळवत प्रेमाने जग जिंकायला हवे. नम्रता हे यशस्वीतेचे मोठे माध्यम असून नाताळचा  प्रेमाचा संदेश घेऊन प्रत्येकाने काम करावे. आज अशांततेच्या वातावरणात प्रेमाचा संदेश हाच मौलाचा आहे संपूर्ण भारतासह संगमनेर मध्ये ही मोठ्या उत्साहाने नाताळ साजरा होत असल्याचे ते म्हणाले. तर या गीत गाण्यांमध्ये दुर्गाताई तांबे यांनीही सहभाग घेतला. यावेळी बाळ येशूच्या दर्शनाला, उंटाचा तांडा निघाला यांसह विविध गीते संगमनेर खुर्द येथील चर्चच्या वतीने साजरी करण्यात आली.

COMMENTS