Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सा.बा.ठाणे मंडळांतर्गत झालेल्या गैरव्यवहाराची एसीबी चौकशी करा

ठाणे सा.बां विभागात देखभाल दुरुस्तीच्या निधीचा गैरव्यवहार

मुंबई/प्रतिनिधी ः ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि गैरकारभारामुळे चर्चेच्या स्थानी आला आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे पालघ

मागासवर्गीय संस्थांच्या विरोधात महाधिवक्तांना उतरवणे योग्य का ?
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे काय होणार ?
सचिव भांगेंनी चालवली ‘25 लाख द्या आणि बार्टीचे केंद्र घ्या’ मोहीम !

मुंबई/प्रतिनिधी ः ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि गैरकारभारामुळे चर्चेच्या स्थानी आला आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे पालघरचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील आणि ठाण्याचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील या जोडागोळीने आपल्या कार्यकाळात देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचा धुडगूस घातला असून, या दोघांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीकडून खुली चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठाणे सार्वजनिक बांधकाम मंडळात 2022-23 अंतर्गत देखभाल दुरूस्ती-विशेष दुरूस्तीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला असून, याप्रकरणी चौकशी झाल्यास मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे. या विभागातील कार्यकारी अभियंता सुनील पाटील, पालघरचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील, टोटेवार यांच्या कार्यकाळात मोठे गैरव्यवहार झाला असून, यासोबतच भिवंडी येथील उपअभियंता शशिकांत चौधरी, ठाणे-1 येथील उपअभियंता श्रीकांत येवले, कल्याण येथील उपअभियंता श्रीमती मोहरीर, ठाणे-5 उपअभियंता श्रीमती काळभरे, ठाणे-3 उपअभियंता श्रीमती चव्हाण, ठाणे-4 श्रीमती पवार यांनी ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागात निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार असल्याची चर्चा सुरू असून, या सर्व अधिकार्‍यांची एसीबीमार्फत खुली चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता सुनील पाटील आणि पालघरचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या पदाचा गैरवापर करणे सुरू ठेवले आहे. त्यांनी निविदा प्रक्रियेत घोळ करून, कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून, देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यावधीची बिले कुणाच्या घशात घातली, याचा शोध घेण्याची गरज आहे. कोणत्याही विकासकामांसाठी निविदा काढणे आवश्यक असते. मात्र कोणतीही वर्कआऊट ऑर्डर नसतांना, या विभागात कोट्यावधींची कामे केली जात आहे. दुरुस्ती/विशेष दुरुस्तीच्या नावाखालील निधी नेमका गेला कुठे असा सवाल उपस्थित होत आहे. नियमबाह्य कामांचे आणि भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे समोर येत आहे. सार्वजनिक निधीतील अपहार, अनियमितता, यासारखे अनेक आरोप होत आहे. या विभागात झालेल्या कामांमध्ये मोठया प्रमाणावर निधीची अफरातफर आणि अनियमितता दिसून येत आहे. या विभागात झालेले बोगस कामे यांसदर्भात या दोन्ही कार्यकारी अभियंत्यांसह उपअभियंत्यांची खुली एसीबी चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अधीक्षक अभियंता विलास कांबळेंच्या डोळ्यात धुळफेक – ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सुनील पाटील आणि पालघरचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांनी आपले वरिष्ठ असलेले अधीक्षक अभियंता असलेले विलास कांबळे यांना खोटी माहिती देवून, निधीचा गैरव्यवहार सुरू केला आहे. त्यामुळे या दोन्ही कार्यकारी अभियंत्यांची एसीबीमार्फत चौकशी झाल्यास अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांच्या अडचणी वाढू शकतात, त्यामुळे विलास कांबळे यांनी सजग राहून या अनागोंदी कारभाराला आळा घालण्यासाठी त्यांनी सुनील पाटील आणि सचिन पाटील यांची झाडाझडती घेण्याची गरज आहे.  

COMMENTS