इस्लामपूर भाजपा कार्यालयावर उच्च न्यायालयाचा हातोडा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर भाजपा कार्यालयावर उच्च न्यायालयाचा हातोडा

इस्लामपूर / प्रतिनिधी :       इस्लामपूर नगरपालिकेचा गाळा बेकायदेशीर प्रक्रिया राबवून नगराध्यक्षांनी भाजपा पक्ष कार्यालयास

ओवेसी यांच्याकडे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचं अंगवस्त्र म्हणूनच पहिले जाईल…
भाजप मधल्या ही त्या नेत्यांची इडीने माहिती जाहीर करावी (Video)
भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

इस्लामपूर / प्रतिनिधी : 

     इस्लामपूर नगरपालिकेचा गाळा बेकायदेशीर प्रक्रिया राबवून नगराध्यक्षांनी भाजपा पक्ष कार्यालयासाठी घेतला होता. त्याविरोधात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष आघाडीच्या वतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यांच्या आत या प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. त्याची पहिली बैठक १२ ऑक्टोबर रोजी घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मंगळवारी दिला आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विश्वनाथ डांगे यांनी दिली.

येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी  काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील उपस्थित  होते. उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एस.जे. काथावाला,न्यायमुर्ती मिलिंद जाधव यांच्या  खंडपीठाने हा निकाल दिला आहे. अँड.उमेश माणकापुरे यांनी आमची बाजू मांडल्याचे श्री.डांगे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी खंडपीठाच्या निकालाची प्रत पत्रकारांना दिली.

श्री.डांगे म्हणाले,नगराध्यक्षांनी आपल्या संबंधित व्यक्तीच्या नांवे नगरपालिकेचा गाळा घेवून त्यामध्ये भाजपा पक्ष कार्यालय थाटले होते. वास्तविक कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा पदाधिकारी अथवा सदस्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालमत्तेचा वापर करता येत नाही. याविरोधात आम्ही बैठकी मध्ये आवाज उठविला. त्यास दाद दिली नसल्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अपक्ष आघाडीच्या वतीने उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील व तेरा सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हा गाळा भाडे पट्ट्याने देण्याची लिलाव प्रक्रिया संगनमताने कशी राबविली आहे? त्यामध्ये नगराध्यक्षांचा आपल्या भाजपा कार्यालयास गाळा घेण्यात सहभाग कसा आहे? हे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तीन व्यक्तींनी हा गाळा मागणी केली होती. त्यांचे अर्ज एकाच हस्ताक्षरात आहेत,मागणी अर्ज पावत्या,अनामत रक्कम भरलेल्या पावत्या,नोटरी क्रमांक सलग आहेत. एकाच व्यक्तीने दोघांच्या अर्जावर साक्षीदार म्हणून सह्या केल्या आहेत. तिघांच्यामध्ये बरेच साम्य आहे. कोरोनाच्या संकटामुळे मार्च २०२० पासून न्यायालये बंद असल्याने या विषयाची सुनावणी लांबली. दरम्यान हा गाळा भाजपा पक्ष कार्यालया साठी तीन वर्षे वापरण्यात आला. मात्र हे प्रकरण अंगलट येणार म्हटल्यावर त्यांनी मुदत वाढ न घेता हा गाळा सोडला आहे.

तीन महिन्यांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कायद्याच्या चौकटीत सर्वंकष चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. त्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी पहिली बैठक घेण्याचा आदेश खंडपीठाने केला आहे. मागे आम्ही ५७ विषयांची विशेष सभा घेण्यासाठी ही उच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यावेळीही असाच आदेश न्यायालयाने दिला होता. नगराध्यक्षांच्या बेकायदेशीर कामाची ही ढळढळीत उदाहरणे आहेत. आम्ही येथून पुढेही त्यांच्या बेकायदेशीर कामाविरोधात न्यायालयीन लढा देणार आहोत. आमचा न्यायव्यस्थेवर पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणा ची चौकशी होवून योग्यती कारवाई नक्की होईल.

     शहाजी पाटील म्हणाले, इस्लामपूर नगर पालिकेच्या लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृहातील २ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचा गाळा शहरात येणाऱ्या पुस्तक प्रदर्शन,खादीची कपडे विक्री अशा नावीन्यपूर्ण कामासाठी ठेवण्यात आला होता. मात्र नगराध्यक्षांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हा गाळा आपल्या पक्ष कार्यालयासाठी भाडे पट्ट्याने घेतला. नगरपालिकेच्या १८० वर्षात इतिहासात या नगराध्यक्षांच्या कारकिर्दीत न्यायालयाने असा दोनदा आदेश दिला आहे.

COMMENTS