Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील शाळांचे रुपडे बदलणार

‘पीएमश्री’ योजना राबविण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील शाळांचे पूर्ण स्वरूप बदलण्याबाबातचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील शाळांचे पूर्ण स्वरूपच बदलणार

येथील भाजी मार्केटमध्ये मित्राने केली मित्राची हत्या I LOKNews24
 बोरी गोसावीत उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पॅनलचे वर्चस्व, विरोधकांना चारही मुंड्या केले चीत 
तहसीलदार साहेब, कर्मचार्‍यांना जरा आवर घाला 

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील शाळांचे पूर्ण स्वरूप बदलण्याबाबातचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील शाळांचे पूर्ण स्वरूपच बदलणार असून केंद्र सरकारची पीएमश्री योजना राज्यात देखील लागू करण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ’प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया’ महाराष्ट्रात राबवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रीमंडळामध्ये खलबते झाली. केंद्र सरकारने सप्टेंबर 2022 मध्ये या योजनेची घोषणा केली होती. या योजनेनंतर्गत देशात 14 हजार 597 शाळा सुरु करण्यात येणार आहे. आदर्श शाळा म्हणून या शाळा ओळखल्या जातील असे सांगितले जात आहे. देशातील 18 लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या पीएमश्री योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील शाळांचे रुपडे बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या अंतर्गत  या शाळेत नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ आणि आधुनिक पायाभूत सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात येईल. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठीही उपायोजना सुचवल्या जातील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या शाळांच्या माध्यमातून अंमलात आणले जाईल. केंद्र सरकारच्या या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात करण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक जीवनाशी निगडित प्रात्यक्षिक शिक्षण देण्याचा प्रयत्न या योजनेत आहे. या शळांमध्ये स्मार्ट क्लास, ग्रंथालय, कौशल्य प्रयोग शाळा, खेळाचे मैदान, विज्ञान प्रयोगशाळा अशा आधुनिक सोयी व सुविधा असतील.

जेजुरी विकासासाठी 127 कोटीच्या निधीला मंजूरी – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  शाळांव्यतिरिक्त आरोग्य, अन्न आणि नागरी पुरवठा, जलसंपदा विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच सेवाग्राम विकास आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळभ छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी 397 कोटी 54 लाख खर्चाचा विकास आराखडा. जेजुरीसाठी 127 कोटी 27 लाखाचा विकास आराखडा. सेवाग्राम विकासासाठी 162 कोटींचा विकास आराखडयास मान्यता देण्यात आली.

COMMENTS