Homeबीड

तोहीद खान हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा द्या; पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा-अ‍ॅड.नासेर खानजलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी; विविध संघटनांचे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन

माजलगाव : परळी येथील तोहीद खान हत्या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुट

पंतप्रधान मोदींच्या दौर्‍यावेळी मानापमान नाट्य
घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या १४ खिडक्यांच्या काचा फोडल्या; समाजकंटकांच्या कृत्यामुळे नागरिकांमध्ये संताप
नव्या शैक्षणिक धोरणावर सोनियांचे टीकास्त्र!


माजलगाव : परळी येथील तोहीद खान हत्या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विविध सामाजिक व अल्पसंख्यांक संघटनांच्या वतीने माजलगाव येथील उपविभागीय अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
अल्पसंख्यांक मुस्लिम संरक्षण समिती, शेतकरी कामगार पक्ष, मौलाना आझाद युवा मंच, एपीसीआर(एपीसीआर) आणि जकीबाबा सोशल वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक मुस्लिम संरक्षण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नासेर खान म्हणाले की, परळीतील तोहीद खान हत्या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. या गुन्ह्यातील सर्व दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवेदन देताना अ‍ॅड. नारायण गोले पाटील, नगरसेवक सय्यद लतीफ, शेख शौकत, इरफान मिर्झा, अ‍ॅड. डोंगरे, बाबा काझी, नवीद सिद्दीकी, अ‍ॅड. भास्कर उजगरे, गोरख टाकणखार, शेख सत्तार टेलर, जयराम राऊत, सुनील शेवाळे, गुलाब शेख, शेख इकरार, जावेद पटेल, नुमान चाऊस, सलमान खान यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, तोहीद खान हत्या प्रकरणामुळे परिसरात संतापाची भावना निर्माण झाली असून, दोषींना कठोर शिक्षा मिळेपर्यंत आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत न्यायासाठीचा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

COMMENTS