Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठ्यांना आरक्षण द्या नसता सत्तेतून पायउतार व्हा-परमेश्‍वर घोडके

कडा - मनोज जरांगे यांच्या मागणी नुसार मराठ्यांना सरसकट व टिकणारे कुणबी प्रमाणपत्र ओ.बी.सी. चे आरक्षण देण्यासाठी, तुम्ही आपल्या विधिमंडळातील सभाग

नीरजा फेम अभिनेत्री ईशा चोप्राचा विनयभंग
गोळीबाराने कर्जत प्रांत कार्यालय हादरले
स्वाभिमानाचे प्रतीक ‘माझी माती, माझा देश’ अभियान

कडा – मनोज जरांगे यांच्या मागणी नुसार मराठ्यांना सरसकट व टिकणारे कुणबी प्रमाणपत्र ओ.बी.सी. चे आरक्षण देण्यासाठी, तुम्ही आपल्या विधिमंडळातील सभागृहातुन 24 ऑक्टोंबर 2023 पूर्वी, मराठा आरक्षण संदर्भात आवाज उठवावा व आरक्षणासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे तातडीने मराठा आरक्षण मागणी करावी नसतां आपणं 24 ऑक्टोंबर नंतर सकल मराठा समाजाने दिलेल्या मतदारांच्या भावना लक्षात घेऊन आ.सुरेश धस व बाळासाहेब आजबे यांनी आपला आमदारकीचा राजीनामा मोठ्या मनाने द्यावा अशी मागणी परमेश्‍वर घोडके यांनी केली आहे.
मराठ्यांच्या पोरांनी शेती केली तरी माती अन् शाळा शिकली तरी माती होत आहे. मराठा समाज खेड्यापाड्यामध्ये राहणारा, शेती करणारा समाज आहे. कालातरांने शेतीचे तुकडे झाले आणि शेतावर पोट भागत नसल्याने शिकलेल्या मराठा समाजचं मुलं नोकरीसाठी बाहेर पडलं. तेव्हा मराठा समाजाच्या मुलांच्या लक्षात आलं 100 मार्क मिळवूनही 50 मार्काचा मुलगा पुढं जातो अन् आपण मागे राहतो. तेव्हा मराठा शेतकर्‍यांच्या मुलांनी शेती केली तरी माती होते अन् शाळा शिकलो तरी माती होते, त्यामुळे आता मराठा समाजाचा, शेतकर्‍याचा पोरगा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे त्यामुळे पिढ्यानपिढ्या रखडलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सरकारला 24 ऑक्टोंबर पूर्वीच निकाली काढण्यास मराठा आमदार म्हणून आपण सत्ताधारी सरकारमध्ये सामील आहात त्यामुळे आपण राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे सकळ मराठा समाजाची आरक्षणाची प्रकर्षाने मागणी करून भाग पाडावे.तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने आपणांस कळकळीची विनंती केली असून दोन्ही आमदारांनी मराठा समाजाचे उपकार कधीही विसरु नयेत. मराठा समजाच्या मतदान रुपी उपकाराची जाणीव ठेवावी, म्हणून तुम्ही सुध्दा एक मराठा लोकप्रतिनिधी म्हणून 24 ऑक्टोंबर पूर्वी जर मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण द्या नसता आपण अशा पाषणहृदय असलेल्या, गरजेवंत मराठा समजाबद्दल जाणीव नसलेल्या सरकार मधून बाहेर पडावे व अशा सत्तेला चिकटून बसू नये..! मराठ्यांना कुणबीतून आरक्षण देणे ही, तुमच्या सह सरकारची नैतिक जबाबदारी समजुन तुमच्या आमदारकीचा राजीनामा मराठ्या समाजासाठी कर्तव्य देऊन टाकावा अशी सकल मराठा समाज आष्टी तालुक्यासह श्री घोडके यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

COMMENTS