Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धाडसी निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो – अशोक चव्हाण

नांदेड : सरकार आमचं यायचं काही प्रश्न नव्हता निर्णय धाडसी होता. तो घेतला नाही तर 5 वर्ष विरोधी पक्षात राहून बोंबलत बसलो असतो, असं वक्तव्य भाजपचे

मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात खलबते
अशोक चव्हाण-अजित पवारांमध्ये ’गुफ्तगू’
अशोक चव्हाणांसह 12 आमदार कॉंग्रेसचा ‘हात’ सोडणार ?

नांदेड : सरकार आमचं यायचं काही प्रश्न नव्हता निर्णय धाडसी होता. तो घेतला नाही तर 5 वर्ष विरोधी पक्षात राहून बोंबलत बसलो असतो, असं वक्तव्य भाजपचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे. अर्धापूर तालुक्यातील पार्डी इथल्या सभेत केला. 1 महिन्यानंतर अशोक चव्हाण यांचे भोकर मतदारसंघातील अर्धापूर येते जंगी स्वागत झालं. त्यानंतर जाहीर सभेत बोलताना अशोक चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे. लोकांचा मनात काय आहे, 80 टक्के लोक मोदी म्हणत होते, त्यानंतर हा निर्णय मी घेतल्याचं अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत सांगितलं आहे. 

भाजप नेते अशोक चव्हाण बोलताना म्हणाले की, “देशातील 80 ते 90 टक्के लोकांच्या मनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तर माझ्या मनातही दुसरे कोणी असण्याचे कारण नाही. त्यामुळे हा धाडसी निर्णय घेतला. भाजपात येण्याचा निर्णय घेतला नसता तर पाच वर्ष विरोधात राहिलो असतो. दिल्लीत आमचे विरोधी पक्षांचं सरकार येण्याचा प्रश्न नव्हताच. मग काय करायचं? विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो.”

COMMENTS